सातारा हद्दीतील कांदाटी खोऱ्यातील उचाट होणार ''जंगल रेशीमचे गाव''

सातारा हद्दीतील कांदाटी खोऱ्यातील उचाट होणार ''जंगल रेशीमचे गाव''

Published on

rat८p४.jpg, rat८p५.jpg ः
८१२५१, ८१२५२
खेडः ‘टसर’ नावाच्या अळीला कांदाटी खोऱ्यातील उचाट गावच्या जंगल भागात आयन नावाच्या झाडांवर सोडण्यात आले आहे.
---------------
कांदाटी खोऱ्यातील उचाट होणार ‘जंगल रेशीमचे गाव’
रत्नागिरी- सातारा हद्दीतील दुर्गम भागात उपक्रम; शेतकऱ्यांच्या हाताला मिळणार काम
खेड, ता. ८ः ‘पुस्तकांचे गाव’, ‘मधाचे गाव'' नंतर आता रत्नागिरी जिल्हाच्या सीमेवरच सातारा हद्दीतील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील उचाट गावाला ''जंगल रेशीमचे गाव'' अशी नवी ओळख प्राप्त होणार आहे. एका बाजूला कोयना धरणाचे बॅकवॉटर आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा बेलाग कडा याच्यामध्ये अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या कांदाटी खोऱ्यातील उचाट या गावाला हा बहुमान मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘टसर’ नावाच्या अळीला या गावातील आयन नावाच्या झाडांवर सोडण्यात आले होते. त्यानंतर या अळीने उत्तम असे कोष तयार केले आहेत. त्यातून रेशीमाचे जाळे विणून येथील शेतकरीवर्गाच्या हाताला काम मिळणार आहे.
सातारा जिल्हाच्या हद्दीतील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील उचाट गावाला या प्रकल्पामुळे अनोखी ओळख प्राप्त होणार असून ते ‘जंगल रेशीमचे गाव’ म्हणून नावारूपास येणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी झाडांवर टसर अळी सोडली असून, त्यानुसार कोष तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळून त्यांना त्यांचे दाम मिळण्यास मदत होणार आहे. रेशीम म्हटले की, महिलांच्या साड्यांसह इतर वस्त्रे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये रेशीम वस्त्राला मोठी मागणीही आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जंगलाचा मोठा भूभाग लाभलेला आहे. दुर्दैवाने या जंगल परिसरातील वाड्यावस्ती, गावांसह परिसर मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. ग्रामस्थांना कामासाठी मुंबई-पुणे गाठावे लागत आहे. घनदाट जंगल अशी कांदाटी खोऱ्याची अशीच ओळख आहे. आता मात्र आता आणखी वेगळी प्राप्त होणार आहे. कांदाटी खोऱ्यातील वनपरिक्षेत्र बामणोली (वन्यजीव) येथील उचाट गावात टसर रेशीम अळी संगोपन व कोषनिर्मिती प्रयोग सुरू करण्यात आला आहे. १ डिसेंबर २०२२ ला आयन नावाच्या वृक्षांवर टसर रेशीम कोषाला सुरवात केल्यानंतर दीड महिन्यातच टसर अळीने कोष तयार करण्यास सुरवात केली आहे. या गावात खेड तालुक्यातून जाता येते. रघुवीर घाटमार्गे खेड उचाट बसफेरी धावत आहे तर खासगी वाहनानेदेखील जाता येते.

चौकट :
दऱ्याखोऱ्यात शाश्वत विकास...
‘टसर (वन्य) रेशीम-शाश्वत रोजगार प्रकल्प’ अंतर्गत कांदाटी खोऱ्यात हा प्रकल्प राबवला जात आहे. आयन वृक्षाची पाने हे टसर अळीचे खाद्य आहे. टसर रेशीमला ‘वन्य रेशीम’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात टसर रेशीम उद्योग आदिवासी समुदायांसाठी रोजगाराचा प्रमुख स्रोत ठरला आहे. दऱ्याखोऱ्यांमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण असून, स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागानेच टसर रेशीम कोषनिर्मिती प्रयोग केला जात आहे.

कोट
या उद्योगामुळे आमच्या कांदाटी खोऱ्याला एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्यामुळे कांदाटी खोऱ्याचा विकास होईल हे निश्चित.
- सदानंद मोरे, ग्रामस्थ, शिंदी-वळवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.