सौरऊर्जेवरील पाणीयोजनेचे लवकरच लोकार्पण

सौरऊर्जेवरील पाणीयोजनेचे लवकरच लोकार्पण

rat०८५.txt

बातमी क्र..५ (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat८p१३.jpg ः
८१३२३
मंडणगड ः पालघरमधील सौरउर्जेवरील पाणी योजनेची पाहणी करताना अधिकारी.
----
सौरऊर्जेवरील पाणी योजना पूर्णत्वास

पालघरमध्ये उभारणी ; चाचणी यशस्वी, लवकरच लोकार्पण

मंडणगड, ता. ८ ः जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली सौरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत येथे उभारण्यात आली आहे. योजनेचे काम पूर्ण झाले असून या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या योजनेचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.
वीजबिल किंवा थकबाकी या डोकेदुखीतून सुटका होण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी सौरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. या योजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी १ लाख ४ हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या योजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी देण्यात आली असून १ लाख ४० हजार इतकी लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. योजनेसाठी पाच एच. पी. सोलर बसवण्यात आले आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे ती चिंता मिटली आहे. या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती पाच वर्षे पॅनेल बसवणारी कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटिंग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जिल्ह्यातील पहिलीच सौरऊर्जेवरील ही नळपाणी योजना असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com