जालगावच्या माजी सरपंचांच्या घराला आग

जालगावच्या माजी सरपंचांच्या घराला आग

Published on

rat८p२४.jpg
८१३६३
जालगावः मनोज भांबीड यांच्या घराला लागलेली आग आणि दुसऱ्या छायाचित्रात आगीत खाक झालेले घरातील सामान.
-----------
जालगावच्या माजी सरपंचांच्या घराला आग
कपडे, धान्य भस्मसात; ३५ लाखाचे नुकसान
दाभोळ, ता. ८ः जालगाव येथील माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य मनोज भांबीड यांच्या जालगाव येथील घराला आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे; मात्र घरातील सर्व वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला आहे. मनोज भांबीड यांचे जालगाव येथे जुने घर होते. पहाटे अचानक विजेच्या मिटर जवळील वायरने अचानक पेट घेतल्याने घराला आग लागली. या आगीत भांबीड यांच्या घरातील कपडे, धान्य व सर्व ऐवज भस्मसात झाला.
आगीची माहिती मिळताच जालगाववासियांनी भांबीड यांच्या घराकडे धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. दापोली नगरपंचायतीचा अग्निशामक बंबही पोचला व आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत भांबीड यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.