यंदा 3 हजार 500 बागायतदार निर्यातीसाठी सज्ज

यंदा 3 हजार 500 बागायतदार निर्यातीसाठी सज्ज

Published on

निर्यातीसाठी ३ हजार ५०० बागायतदार सज्ज
मँगोनेटवर ऑनलाईन नोंदणी; ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत
रत्नागिरी, ता. ८ ः निर्यातीसाठी ’मँगोनेट’ प्रणालीवरील नोंदणीला जिल्ह्यातील हापूस आंबा बागायतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा नवीन नोंदणीसह नूतनीकरणासाठी ३ हजार ५०० पेक्षा अधिक बागायतदारांची मँगोनेटवर ऑनलाईन नोंदणी केली आहे.
स्थानिक बाजारपेठांबरोबरच निर्यातीसाठी जिल्ह्यातील आंबा उत्पादक व बागायतदार पुढे येत आहेत. मँगोनेटवर २०२१ पर्यंत जिल्हयातील ४ हजार ५६६ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर ३ हजार ३९९ आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले होते. आता २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी करण्याची मुदत दिलेली आहे. युरोपियन देशांनी भारतातून निर्यात होणार्‍या ताजी फळे व भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा निर्यातीवर २०१३ मध्ये बंदी घातली होती. त्याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला होता. परिणामी कोकणातील आंबा बागायतदार २०१२ पासून परदेशी आंबा निर्यातीसाठी मँगोनेट’ रजिस्टर होत आहेत.
हापूसला उत्तम दर मिळावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मँगोनेटचा पर्याय शोधला आहे. २०१४-१५ पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली तर दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढावा यासाठी वर्षभर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मँगोनेट अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये निर्यातक्षम आंबा बागांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. आंबा बागांची नोंदणी ५ वर्षासाठी वैध आहे. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. नव्याने करावयाच्या नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा, ८ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
-----------
चौकट १
मँगोनेट नोंदणी केलेले बागायतदार
वर्ष मँगोनेट नोंदणी
------------------------
* २०१४-१५ १७०६
* २०१५-१६ २३४
* २०१६-१७ १९३
* २०१७-१८ ३३
* २०१८-१९ ८३५
* २०१९-२० ९५१
* २०२१-२२ १,६४३
* २०२२-२३ ३,५०० आजपर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.