Tue, March 21, 2023

दिगवळे म्हाय जत्रा उत्साहत
दिगवळे म्हाय जत्रा उत्साहत
Published on : 9 February 2023, 1:20 am
दिगवळे म्हाय जत्रा उत्साहत
कनेडीः दिगवळे रांजणवाडी आणि नरडवे भेर्देवाडी यांच्यावतीने भैरव गडावरील माघ पौर्णिमाला वार्षिक म्हाय जत्रा भक्तिमय वातावरणात साजरी झाली. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात आणि काही अडचणीमुळे या जत्रेला स्थानिकांचा विरोध होता. यावर्षी भैरवनाथ जत्रोसव समिती मार्फत योग्य नियोजन करण्यात आले. यामध्ये समिति सदस्य, ग्रामस्थ आणि आमदार नितेश राणे यांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळाले. यंदा पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा झाला. रात्री धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच रात्री देवस्वाऱ्या गडावर जावून पारिपांरिक कार्यक्रम झाला, अशी माहीती भैरवनाथ जत्रोसाव कमिटीचे अध्यक्ष राजन कदम यांनी दिली.