संगीत मल्लिकाचे सर्वांगसुंदर सादरीकरण

संगीत मल्लिकाचे सर्वांगसुंदर सादरीकरण

rat०९२०.txt

बातमी क्र..२० (टुडे पान २ साठी, अॅंकर)
(टीप- राज्य नाट्य स्पर्धा लोगो)

फोटो ओळी
-rat९p१.jpg ः
८१५०६
रत्नागिरी ः कलारंग नाट्य प्रतिष्ठान वरवडे-खंडाळा, रत्नागिरी या संस्थेच्या ''संगीत मल्लिका'' नाटकात नायिकेचा उलगडलेला जीवनपट. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----

संगीत मल्लिकाचे सर्वांगसुंदर सादरीकरण

''मल्लिका-ए-गजल बेगम अख्तर'' यांचा आभास; ''कलारंग''ची उत्तम कलाकृती

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः राज्य नाट्यस्पर्धेत तालुक्यातील वरवडे-खंडाळा येथील कलारंग नाट्य प्रतिष्ठान या संस्थेच्या ''संगीत मल्लिका'' या नाटकाच्या पहिलाच प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लेखक अमेय धोपटकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या नव्या कोऱ्या रंगपटाचा ''तुही दाता'' या बहारदार नांदीनेच नाटकाच्या संगीताची पहिली पायरी जिंकली. दिग्दर्शक नितीन जोशी यांची कल्पकता प्रत्येक प्रसंगांतून दिसली आणि भरगच्च प्रेक्षागृह रसिकांच्या टाळ्यांनी भरून गेला. नाटकातून उलगडलेल्या एका नायिकेचा जीवनपट पाहताना ''मल्लिका-ए-गजल बेगम अख्तर'' यांचा आभास झाला.
---
काय आहे नाटक?

संगीत मल्लिका नाटकाचा आरंभ राहत मियाँ व रशिदा यांच्या कौटुंबिक प्रसंगाने होतो. राहत मियाँचे रशिदाशी प्रेम असूनही त्याला तिचा सहवास लाभत नाही. त्याच्या दोन मुलींपैकी विषप्रयोगात रशिदाच्या एका मुलीचा अंत होतो. दुसरी मुलगी बिबो-रुईना व रशिदा यांच्या पुढील आयुष्यासाठी तजवीज करतो आणि निघून जातो. रुईनाने संकटाशी दोन हात करावेत, स्वतःच्या पदरी आलेले दुःख मुलीच्या वाट्याला येऊ नये यासाठी रशिदा झटत असते. वडिलांच्या इच्छेनुसार रुईनाला लहानपणीच गाणं शिकण्यासाठी तिला प्रसिद्ध गुरू बाबा पुनावाला यांच्या आश्रमात ठेवते आणि रुईनाचा सांगितिक प्रवास सुरू होतो. गुरूजी संगीत कलेतील त्यांच्या व्रतस्थ जीवनातील संच तिला बहाल करतात. हळूहळू गुरूचे सर्व गुण ती आत्मसात करते. पुढे बाबा पुनावाला रुईनाला आशीर्वाद देऊन देवदर्शनाला निघून जातात आणि रुईना आईकडे येते. तिथून ती उस्ताद मोहम्मद नसीम पटियावली यांच्याकडे गाण्याचे पुढील शिक्षण घेते. एका कार्यक्रमादरम्यान नवाब नादीर शेख रुईनाला बंगल्यामध्ये कार्यक्रमाला नेतो; मात्र तिच्याबरोबर कुणी नाही पाहून तिच्यावर अत्याचार करतो आणि आईप्रमाणेच रुईनाचंही जीवन उद्ध्वस्त होतं; पण रशिदा तिला पुन्हा उभं राहाण्याची ताकत देते. उदरनिर्वाहासाठी गाणं हा एकच मार्ग तिच्यापुढे असतो. तिला आकाशवाणीचे कार्यक्रम मिळतात, प्रसिद्धी होते. कालांतराने गायिका म्हणून ती जगप्रसिद्ध होते; मात्र जीवनात घडलेल्या चित्रविचित्र घटनांचे शल्य सतावत असते. त्यातून ती मद्याच्या आहारी जाते. एकाकीपणा तिला खात असतो. यातून बाहेर पडण्यासाठी ती हजयात्रेला जाते. तिथून परतताना प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या रुईना-मल्लिकाला ट्रेनमधून उतरल्यावर अचानक तिचे गुरू बाबा पुनावला यांची भेट होते. दोघेही पुन्हा आश्रमाकडे वळतात आणि रुईनाचे जीवन पूर्वपदावर सुरळीत होते, अशी या नाटकातील कथा.
या नाटकात संगीतकार व वादकांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे. सर्वसाधारण मैफलीत न वापरल्या जाणाऱ्या नऊ मात्रांच्या मत्त ताल बांधलेले पद कौतुकास्पद आहे तसेच रुईनाचे पात्र रंगवणाऱ्या पाच मुलींनी त्या त्या वयातील सादरीकरणाला न्याय दिला. बालकलाकार सौम्या आठल्ये हिचा आत्मविश्वासपूर्व वावर आणि शब्दफेक वाखाणण्यासारखी होती. उत्तम ऑर्गनसाथ, प्रसंगानुरूप सादर झालेली समधूर नाट्यपदं, अभिनय, नेपथ्य, संगीत, रंगभूषा अशा चोहोबाजूनी रंगत जाणाऱ्या या नाटकाला रसिकांना टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकाशयोजनेतील काही त्रुटी आणि लांबलेला ब्लॅकआऊट या दोन गोष्टींवर काम करण्याची गरज वाटली. एकूणच नाटकातून एका सर्वांगसुंदर कलाकृतीचे दर्शन रसिकांना झाले.
-------

* पात्र परिचय
राहतमियाँ आणि गोपाळ बाबू ः नितीन जोशी, रशिदा ः समृद्धी पेंडसे, गुरूजी बाबा पुनावाला ः विजय रानडे, उस्ताद मोहम्मद नसीम पटियालवी ः केतन गोगटे, मॅनेजर ः हेमंत चक्रदेव, नवाब नादीर शेख ः गिरीश जोशी, रुईना ः बालकलाकार सौम्या आठल्ये, सई थोरात, जान्हवी खडपकर, तन्वी मोरे आणि समृद्धी पेंडसे. गर्दी आणि सहाय्यक ः उमेश जोशी, ओंकार जेशी, स्वप्नील धनावडे, सुरेश गावडे, विराज मेस्त्री, गणेश साठे, संचिता जोशी.
--------
* सूत्रधार आणि साह्य
संगीत दिग्दर्शन ः विजय रानडे, पार्श्वसंगीत ः ऋग्वेद जोशी, प्रकाशयोजना ः अमेय धोपटकर, शेखर मुळ्ये, अनिकेत गानू. रंगभूषा ः कृष्णा शिर्के, केतकी जोशी, अपूर्वा जोशी. वेशभूषा ः शुभा जोशी, नेपथ्य ः गणेश साठे, अरुण जोशी. ध्वनी संयोजन ः अरुण जोशी आणि एस. कुमार साऊंड, रंगमंच व्यवस्था ः उमेश जोशी. सूत्रधार ः गुरूवर्य दत्तात्रय बिलवलकर.
--------
* आजचे नाटक
नाटक ः संगीत तमसो मा ज्योतिर्गमय, सादरकर्ते ः दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com