कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहायला हवे

कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहायला हवे

Published on

rat०९२१.txt

(टुडे पान २ साठीमेन)
(टीप- ग्राफीक पद्धतीने मांडता येते का पहावे, प्रत्येकाची वेगळी चौकट करून लावल्यास उत्तम होईल.)

फोटो ओळी
-ratchl९२.jpg ः
८१५५४
चिपळूण ः परिसंवादात भूमिका मांडताना प्रसाद गावडे.
----

कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहा

आशुतोष बापट ; पर्यटन आणि कोकणाचा दुवा बना

चिपळूण, ता. ९ ः कुठल्याही पर्यटनस्थळाची तुलना कोकणाशी होते हे लक्षात घेतले तर कोकणाचे महत्व लक्षात येईल. त्यामुळे कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहायला हवे, असे प्रतिपादन भारतीय प्राच्यविद्या, स्थापत्य, मूर्ती आणि मंदिरांचे ज्येष्ठ अभ्यासक आशुतोष बापट यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात अखेरच्या दिवशी शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवादात आशुतोष बापट बोलत होते. या परिसंवादात स्थापत्य विशारद मकरंद केसरकर, गारवा कृषी पर्यटनाचे सचिन कारेकर, कोकणी रानमाणूस यूट्यूबर प्रसाद गावडे आणि प्राचीन कोकणचे संचालक वैभव सरदेसाई यांनी भाग घेतला.
बापट म्हणाले, कोकणाला लाभलेला निसर्ग हे एक मोठे भांडवल आहे; पण त्याचा अभ्यास करून ते लोकांसमोर आणले पाहिजे. छत्तीसगड राज्यातील बस्तर गाव कुख्यात होते; पण आता तो परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. महाराणा प्रताप हे जेथे काही क्षण थांबले होते ते ठिकाणही तेथे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. बिवली गावात विष्णूची धातूची पुरातन मूर्ती आहे. मूर्तीवर असलेल्या गळ्यातील माळांवर आंबेही कोरले आहेत. याचा अर्थ ती मूर्ती स्थानिक कलाकारांनीच कोरली असेल. याचा अभ्यास करून कोकणवासीयांनी पर्यटक आणि कोकणाचा दुवा बनले पाहिजे.
वैभव सरदेसाई म्हणाले, कोकणाला इतिहास आहे, लोककला, खाद्यपदार्थ, जैविविधता, कातळशिल्प, विस्तीर्ण सडे असे पर्यटनाचे शाश्वत पैलू आहेत. ते अनुभवायला या, असे आवाहन पर्यटकांना करायला हवे. परिसंवादाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले तर प्रकाश घायाळकर यांनी आभार मानले.
--
पूरक व्यवसाय यशस्वी
हळदीची एसके ४ ही नवी जात विकसित केली. हीच हळद माझा ब्रँड बनणार आहे. पुढे गावातील रम्य वातावरण म्हणजेच गारवा हे पर्यटन विसावा स्थळ सुरू केले. पक्षी बारकाईने पाहिले. छायाचित्रण केले. तेथे १९५ प्रकारचे पक्षी तेथे येतात, याची नोंद घेतली. हे पर्यटकांना समजल्यानंतर त्यांचा ओघ सुरू झाला.
सचिन कारेकर .

-------

पर्यटन हा आनंद देण्याचा विषय ः गावडे

पर्यटन हा आनंद देण्याचा विषय आहे. स्वतःचे वेगळेपण घेऊन काम करायला हवे. जगाला आपल्याकडे बोलावले तर प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून जगातील सुसंस्कृत आणि वेगळेपणा आवडणारे लोक यायला हवेत.
प्रसाद गावडे
------

जंगले टिकवली पाहिजेत
टुरिझमपेक्षा ट्रॅव्हलिझम असा शब्दप्रयोग असायला हवा आहे. कोकणाचा विचार केला तर आहेत ती जंगले टिकवली गेली पाहिजेत.
मकरंद केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.