कोदवलीतील ग्रामविकास संस्थेचे विरारला चिंतन शिबिर

कोदवलीतील ग्रामविकास संस्थेचे विरारला चिंतन शिबिर

Published on

rat०९२२.txt

(टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat९p१३.jpg ः
८१५५१
विरार ः चिंतन शिबिरामध्ये बोलताना संस्था सचिव विलास पळसमकर.
---

कोदवलीतील ग्रामविकास संस्थेचे चिंतन शिबिर

राजापूर, ता. ९ ः तालुक्यातील कोदवली येथील ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी या संस्थेचे नुकतेच विरार (मुंबई) येथे संस्थाध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये गावच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिबिराचे औचित्य साधून ग्रामविकास सेवा संस्थेच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर, सचिवपदी विलास पळसमकर तर खजिनदारपदी कैलास मांडवकर यांची निवड करण्यात आली.
विरार येथे झालेल्या या शिबिराला संस्थाध्यक्ष मांडवकर यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार झिमाजी मांडवकर, विठ्ठल मांडवकर, सिताराम धांगट, प्रफुल्ल मांडवकर आदींसह मोठ्या संख्येने संस्था पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. शिबिरामध्ये गावविकासासंबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली तर त्याचवेळी काही विषयांच्या अनुषंगाने सर्वानुमते ठरावही पारित करण्यात आले. या वेळी नव्या कार्यकारिणीची निवड करताना मावळत्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्‍यांचा सत्कार करण्यात आला. संस्था सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या योगवर्गामध्ये योगशिक्षक योगेन मांडवकर यांनी मार्गदशन केले. ज्येष्ठ समाजसेवक आणि कुणबी बँकेचे संचालक पी. डी. ठोंबरे यांनी संस्थेच्या संचालनामध्ये येणऱ्‍या अडचणी कशा दूर करायच्या, कोकणातील रखडलेल्या विकासाला चालना कशी द्यावी आदींच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.