भिवा महाडेश्वर यांचे यश

भिवा महाडेश्वर यांचे यश

Published on

swt९१७.jpg
८१५७८
भिवा महाडेश्वर

भिवा महाडेश्वर यांचे यश
बांदाः गोवा येथे झालेल्या पॅसिफिक इंटरनॅशनल मास्टर अॅथलिट चॅम्पियनशिप स्पर्धेत माणगाव (ता. कुडाळ) येथील भिवा महाडेश्वर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्ण व एक रजत अशी एकूण तीन पदके मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण यश मिळविलेल्या महाडेश्वर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाड़ेश्वर यांनी या स्पर्धेत ११० मीटर हर्डल्समध्ये सुवर्ण, लांब उडीमध्ये सुवर्ण, तर १०० मीटर धावणेमध्ये रजत पदक मिळविले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर ३५ वर्षांवरील गटांत घेण्यात आली. या स्पर्धेत जगातील विविध देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. महाडेश्वर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळविली आहेत.
..............
swt९१८.jpg
८१५७९
डॉ. रुपेश पाटकर

डॉ. रुपेश पाटकर यांना नेरुरकर पुरस्कार
बांदाः येथील नट वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी येथील प्रतिथयश साहित्यिक डॉ. रुपेश पाटकर यांना जाहीर झाला आहे. प्र. श्री. नेरुरकर यांच्या जयंतीदिनी १४ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वाचनालयच्या सभागृहात नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गेली १० वर्षे सातत्याने हा कार्यक्रम वाचनालयाच्या वतीने साजरा करून कै. नेरुरकर यांच्या आठवणीना उजाळा दिला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी प्रतिथयश साहित्यिकाला प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार बांदा वाचनालयाच्या वतीने दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा मनोविकारतज्ज्ञ डॉ. पाटकर यांना जाहीर झाला आहे. डॉ. पाटकर यांचे आतापर्यंत विविध साहित्य प्रकाशित झाले आहे. विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. गोव्यात मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांचे अनेक संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. लहान मुलांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या त्यांच्या ‘बबलूची डायरी’ या पुस्तकाला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. या कार्यक्रमास सर्व साहित्यिक, साहित्यप्रेमी व प्र. श्री. नेरुरकर यांच्या विद्यार्थ्यांनी, बांदावासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.