संक्षिप्त

संक्षिप्त

rat०९८.txt

बातमी क्र..८ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat९p१९.jpg ः
८१५८३
अनंत नवगरे
----------------
अनंत नवगरेंना पुरस्कार जाहीर

मंडणगड ः नाथपंथी गोसावी समाजाच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार पालवणी येथील ग्रामस्थ अनंत नवगरे यांना देण्यात आला. पालवणी गोसावीवाडी येथे नाथपंथी गोसावी समाजाचे ४२वे आधिवेशन नुकतेच पार पाडले. या वेळेस समाजातील विविध गावातून व मुंबईहून नाथपंथी गोसावी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोसावी समाजाचे अध्यक्ष अनंत मंडपे यांनी पालवणीचे सुपुत्र अनंत नवगरे यांना नाथपंथी गोसावी समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे या वेळी घोषित केले. नवगरे यांना या वर्षीचा ''समाजभूषण पुरस्कार'' वितरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम श्रीकृष्ण हॉल दादर पूर्व येथे देण्याची घोषणा करण्यात आली. त्यांनी १९९९ ते २००३ पर्यंत नाथपंथी गोसावी समाजाचे अध्यक्षपदावर काम करून समाजाला शैक्षणिक, आर्थिकदृष्टीने प्रगतीपथावर नेण्याचे विषेश कार्य भूषवले होते.
------
फोटो ओळी
-Rat९p२०.jpg ः
८१५८४
मंडणगड ः यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्था पदाधिकारी व शिक्षकवर्ग.
--
अबॅकस परीक्षेत राजीव गांधी स्कूलचे यश

मंडणगड ः मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अबॅकसमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचा नववीमध्ये शिकणारा सुशांत दहिफळे याने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये चौथा नंबर पटकावला तसेच नववीमधून आर्यन जाधव, पाचवीमधून श्रीयान किंजळे, सातवीमधून सृष्टी कुंभार आणि सिमरन जाधव यांनी गोल्ड मेडल पटकावले. या विद्यार्थ्यांना अबॅकससाठी शिक्षक महेश सुतार व जयेश कुलाबकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन संतोष मांढरे, प्रशालेचे मुख्याध्यापक महाजन व मुख्याध्यापिका ठसाळे व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com