रत्नागिरी-रखडलेली अंदाजपत्रके पूर्ण करून चॅम्पियन व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रखडलेली अंदाजपत्रके पूर्ण करून चॅम्पियन व्हा
रत्नागिरी-रखडलेली अंदाजपत्रके पूर्ण करून चॅम्पियन व्हा

रत्नागिरी-रखडलेली अंदाजपत्रके पूर्ण करून चॅम्पियन व्हा

sakal_logo
By

rat०९७.TXT

बातमी क्र. ७ (टुडे पान १ साठीमेन)

फोटो ओळी
- rat९p२३.jpg- KOP२३L८१५८७
रत्नागिरी ः जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावणार्‍या बांधकाम विभागाला चषक देऊन सन्मानित करताना पालकमंत्री उदय सामंत.


रखडलेली अंदाजपत्रके पूर्ण करून चॅम्पियन व्हा
पालकमंत्री सामंतांची बांधकामला सूचना ; क्रीडा स्पर्धेतील अव्वल बांधकाम विभागाचा गौरव
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन आदर्शवत विकासाची यंत्रणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नेतृत्त्वाखाली निर्माण करावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावणाऱ्या बांधकाम विभागाने पुढील पंधरा दिवसात रखडलेल्या कामांची अंदाजपत्रके पूर्ण करावीत, अशी सूचना मंत्री सामंत यांनी केली.
जिल्हा परिषद स्नेहसंमेलनाच्या उद्घाटना वेळी मंत्री सामंत बोलत होते. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांचा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यंदा सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागाने पटकावले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, सुवर्णा सावंत, महिला व बाल विकास अधिकारी नयना इंगवले यांच्यासह माजी सभापती बाबू म्हाप, प्रकाश रसाळ उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले,''रत्नागिरीत होत असलेले संमेलन राज्यातील अन्य जिल्हापरिषदेत साजरे होत नाही. तीन दिवसांचा हा कार्यक्रम छोटा असला तरीही यामधून सकारात्मक मानसिकता तयार होते. यंदा बांधकाम विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. त्या सर्वांनाच माझी विनंती आहे की गेल्या काही दिवसात आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक कामांची अंदाजपत्रके रखडली आहेत. ती पंधरा दिवसात करुन त्याची जनरल चॅम्पियनशिप तुम्हाला मिळाली पाहिजे. आतापर्यंत ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम केले, तेथे स्नेहसंमेलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही प्रेरणा दिनेश सिनकर, वामन कदम यांच्याकडून मिळाली आहे. पुढील वर्षी हा कार्यक्रम नवीन इमारतीत झाली पाहिजे याची जबाबदारी बांधकामकडे आहे. सव्वातीन कोटी रुपये जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आले आहेत. त्याचे कामही सुरू झाले आहे. त्याचे काम दर्जाप्रमाणे झाले पाहिजे, ही जबाबदारी बांधकामची आहे.

चौकट

सीईओंना दिला सल्ला
कोकणातील जिल्हा परिषद कर्मचारी भावनिक आहेत. त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि लढ म्हणून सांगितले तर ते परत मागे पाहणार नाहीत. मात्र हात वर केला तर ते स्वाभिमानी असल्याचे दाखवतील. यापुर्वी एक सीईओ येथे होते, त्यांनी स्नेहसंमेलन करायचे नाही असे सांगितले. तसे केल्यावर त्यांची रत्नागिरीकरांनी चोविस तासात बदली केली. तेव्हा जे कर्मचारी चुका करतील त्यांच्यावर कारवाई करा; मात्र चांगले काम करत असलेल्यांच्या पाठशी उभे रहा असा सल्ला मंत्री सामंत यांनी दिला.