राजापूर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी कमलाकर कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी कमलाकर कदम
राजापूर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी कमलाकर कदम

राजापूर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी कमलाकर कदम

sakal_logo
By

rat०९३४.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat९p२४.jpg ः
८१६०२
प्रकाश कुवळेकर
-rat९p२५.jpg ः
८१६०३
कमलाकर कदम
--

राजापूर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी कदम

राजापूर, ता. १० ः राजापूर तालुका शिवसेनेमध्ये (उद्धव ठाकरे) संघटनात्मक पदाधिकाऱ्‍यांमध्ये बदल झाले असून तालुकाप्रमुखपदी माजी सभापती कमलाकर कदम यांची निवड झाली आहे. मावळते तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांना संघटनेमध्ये बढती देताना त्यांची राजापूर विधानसभेच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे संघटनात्मक बदल झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील काही संघटनात्मक पदाधिकाऱ्‍यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये तालुक्यामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गेली अनेक वर्षे तालुकाप्रमुख म्हणून यशस्वी काम केलेले कुवळेकर यांना संघटनात्मक बढती मिळताना त्यांची विधानसभा क्षेत्र समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली तर तालुकाप्रमुखपदी सागवेचे विभागप्रमुख कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांनी दोनवेळा राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले असून दोनवेळा तालुक्याचे सभापतीपद भूषवणारे ते एकमेव सभापती आहेत. त्यांची पत्नी करुणा कदम यांनीही तालुक्याचे सभापतीपद भूषवले असून पंचायत समितीचे सभापतीपद भूषवणारे तालुक्यातील कदम हे एकमेव दाम्पत्य आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांसह मित्रपरिवाकडून अभिनंदन केले जात आहे.