क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat०९२५.txt

बातमी क्र.. २५ ( पान३साठी)
(टीप- पहिली बातमी सिंगल कॉलममध्ये घेऊ नये.)

तरुणाची १२ लाख ४० हजाराची फसवणूक

नोकरीचे आमिष ; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा

रत्नागिरी ः कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार जणांनी १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन सिंग, कनक कार्तिक, अभिषेक समंथा आणि राजेश्वर अशी चार संशयितांची नावे आहेत. ही घटना ९ डिसेंबर २०२२ सकाळी ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल देवजी खापले (वय २२, रा. चिंचवाडी देवूड, रत्नागिरी ) यांना ९ डिसेंबरला रोशन सिंगने फोन करून मी नोकरी डॉट कॉममधील अधिकारी बोलत आहे, असे सांगितले. त्यांने तुम्हाला एका नामवंत कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी खापले यांना नोकरी डॉटकॉमच्या खात्यात टप्प्याटप्प्याने २ लाख ३८ हजार ८८८ रुपये भरायला भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी इतर संशयितांनी आपण संबधित नामवंत कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून कंपनीत डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागामध्ये राहुलची निवड झाल्याचे सांगितले. त्यानी कंपनीतील प्रक्रिया सुरू असल्याची कारणे सांगून १० लाख १ हजार ८५१ रुपये आपल्या खात्यात भरून घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी खापले यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सायबर पोलिस ठाणे करत आहेत.
--
दुचाकीचा अपघात, स्वाराविरुद्ध गुन्हा

पावस ः रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावचे रहिवासी असलेल्या वाहनचालक अक्षय अनंत शिंदे (वय २२) यांच्यावर अपघात प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, शिंदे आपल्या मोपेडवर यातील संतोष घवाळी (४७), महेंद्र घवाळी (दोन्ही रा. डोर्ले) यांना मागे बसवून दाभिळ आंबेरे ते डोर्ले असे जात होते. डोर्ले हद्दीजवळ तीव्र उतारावर भरधाव वेगात चालवून अपघात करून गाडीवर मागे बसलेले संतोष देवु घवाळी (रा. डोर्ले) यांच्या मृत्यूस आणि स्वतःच्या व महेंद्र सहदेव घवाळी (रा. डोर्ले, ता. जि. रत्नागिरी) यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला. म्हणून पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. ही घटना २६ जानेवारी २०२३ ला रात्री घडली होती. त्यामध्ये संतोष घवाळी गंभीररित्या जखमी झाले. मुंबई येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
-------