भंडारी समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारी समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धा
भंडारी समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धा

भंडारी समाज मंडळातर्फे वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

81652

फोटोसंक्षिप्त

भंडारी समाज मंडळातर्फे
वेंगुर्लेत क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्ले ः भंडारी मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धा समाजातील युवकांची समाज बांधणी करून त्यांना प्रोत्साहन देणारी आहे. भंडारी समाजातील युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपला खेळ वृद्धिंगत करावा, असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेचे अध्यक्ष अॅड. श्याम गोडकर यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले आयोजित क्रिकेट स्पर्धा ''वेंगुर्ले भंडारी चषक २०२३''चे उद्‌घाटन मंडळाचे तालुकाध्यक्ष अॅड. गोडकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतून भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अ व ब असे दोन संघ तयार करून ते सिंधुदुर्ग भंडारी महासंघाच्या १४ व १५ फेब्रुवारीला होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत खेळविणार असल्याचे अॅड. गोडकर यांनी सांगितले. उद्‌घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव विकास वैद्य, डॉ. आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर, आनंद केरकर, बाबली वायंगणकर, विलास मांजरेकर, श्रेया मांजरेकर, गजानन गोलतकर, दीपक कोचरेकर, राजू गवंडे, आळवे गुरुजी व खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. सचिन परुळकर यांनी, तर आभार सत्यवान साटेलकर यांनी मानले.


81653
क्री़डा महोत्सवाचे
वेंगुर्लेत उद्‍घाटन
वेंगुर्ले ः रामघाट कला, क्रीडा मंडळामुळे स्थानिक महिला, पुरुष आणि मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सर्वांनाच यश मिळते असे नाही; मात्र अपयशातून अनुभव मिळत असल्याने या संधीचे सोने विद्यार्थ्यांनी करावे. विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करावी, असे आवाहन येथील पालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर यांनी केले. येथील रामघाट कला, क्रीडा मंडळाच्या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंगचेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष केदार आंगचेकर, डॉ. आनंद बांदेकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर जबडे, शशिकांत साळगावकर, सुदेश आंगचेकर, नामदेव सरमळकर, प्रार्थना हळदणकर, दीपा पेडणेकर, वैष्णवी वायंगणकर, हेमंत गावडे, जयेश परब, बाळू धुरी, जॉन डिसोजा उपस्थित होते.