हर्णै-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण
हर्णै-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण

हर्णै-सभापतिपदी शिवाजीराव शिगवण

sakal_logo
By

rat१०१९.txt

बातमी क्र..१९ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१०p१२.jpg ः
८१७५०
दापोली ः नवनिर्वाचित सभापती शिवाजीराव शिगवण यांचे अभिनंदन करताना डावीकडून संचालिका सुनीता बेलोसे, उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, उजवीकडून संचालक अनंत सणस, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले व प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड.
-----
बेलोसे फाउंडेशनच्या सभापतीपदी शिगवण

हर्णै, ता. १० ः दापोली येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. संस्थेच्या सभापतिपदी शिवाजीराव शिगवण, तर उपसभापतिपदी प्रियदर्शन बेलोसे यांची निवड झाली आहे.
कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी निवडणूक प्रक्रिया सांगून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिचय करून दिला. या प्रसंगी शिवाजीराव शिगवण यांनी महाविद्यालयाचे गतवैभव व आठवणी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी यापुढे संस्था व महाविद्यालयाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिगवण हे कृषी पदवीधर असून ते पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून सेवेत होते. आज या संस्थेतील ४० वर्षाचा सदस्य ते सभापती असा प्रवास त्यांनी पूर्ण केला. तसेच त्यांनी आरोग्य समिती सभासद, खरेदी-विक्री संघ संचालक व नगरपंचायत प्रथम नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. बेलोसे हे एमबीए असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी विविध नामांकित उद्योगसंस्थांमध्ये प्रशासकीय पदावर काम केले आहे. या प्रसंगी वराडकर-बेलोसेचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी महाविद्यालयातर्फे त्यांचे यथोचित स्वागत करून ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. या वेळी कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, सहकार्यवाह अनंत सणस व संचालिका सुनीता बेलोसे, डॉ. भारत कऱ्हाड व बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.