
-ग्रामीण संमेलनातून कोकणभूमीचा जगभरात प्रचार
rat१०४.txt
बातमी क्र..४ (पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१०p२७.jpg-
८१८०८
तळवडे (ता. राजापूर) ः संमेलनाच्या पूर्व दिवसाचा आरंभ करताना पितांबरी उद्योगसमुहाचे मालक रवींद्र प्रभूदेसाई, सुभाष लाड आदी.
-rat१०p२८.jpg ः
८१८०९
आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व दिवसाच्या प्रारंभी पितांबरी उद्योगसमुहाचे मालक रवींद्र प्रभूदेसाई यांचा सत्कार करताना संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आदी.
--------------
ग्रामीण संमेलनातून कोकणभूमीचा प्रचार
रवींद्र प्रभूदेसाई ; तळवडेतील साहित्यनगरीत पूर्वसंध्येला विविध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः कोकणातील खेड्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाने भारावून गेलो असून यामुळे ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला अंकूर फुटेल. यातून स्वर्गीय कोकणभूमीचा जगभरात प्रचार होईल, असा आशावाद पितांबरी या सुप्रसिद्ध उद्योगसमुहाचे मालक, उद्योजक रवींद्र प्रभूदेसाई यांनी व्यक्त केला.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामवाचनालय तळवडे (पाचल, राजापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजलेल्या ८व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वदिवसाचा आरंभ पितांबरी या सुप्रसिद्ध उद्योगसमुहाचे मालक उद्योजक रवींद्र प्रभूदेसाई यांच्या हस्ते गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीत झाला. या वेळी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष संमेलन संयोजक सुभाष लाड, तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, सुहास प्रभूदेसाई, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, प्राथमिक केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर, सरस्वती विद्यामंदिर पाचलचे उपमुख्याध्यापक सिद्धार्थ जाधव, स्पर्धेचे परीक्षक वि. धा. कोंडगेकर, कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट लांजाचे संस्थापक मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीतील मुख्य सभागृहात प्रभुदेसाई यांच्या हस्ते पहिल्या सत्रात आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे उद्धाटन झाले. या वेळी प्रभूदेसाई यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. संमेलन संयोजक सुभाष लाड यांनी संघाची या मागील भूमिका विशद करत कोकणातील नवप्रतिभेला व्यासपीठ मिळावे म्हणून सुरू केलेल्या या संमेलनाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साहित्य रसिकांनी ११ व १२ फेब्रुवारीला या संमेलनाला उपस्थित राहून साहित्यानंदाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले. सायंकाळच्या दुसऱ्या सत्रात राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या व तळवडे गावाला सुजलाम्-सुफलाम् करणाऱ्या अर्जुना नदीचे पूजन करण्यात आले.
--