संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांवर सावंतवाडीत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या
दोघांवर सावंतवाडीत कारवाई
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांवर सावंतवाडीत कारवाई

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांवर सावंतवाडीत कारवाई

sakal_logo
By

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या
दोघांवर सावंतवाडीत कारवाई
सावंतवाडी, ता. ११ ः शहरात संशयास्पदरित्या फिरताना आढळलेल्या दोघांना नागरिकांनी येथील पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली. पिंटूनाथ बाबासो कोळी (रा. सांगली) व कांताप्पा लिंगाप्पा पुजारी (वय ३८, रा. कर्नाटक) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळी व पुजारी हे दोघेही सकाळच्या सुमारास येथील शहरात भंगार घेण्याच्या बहाण्याने फिरत होते. यावेळी जागरूक नागरिकांनी त्यांना येथील पोलिस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली.