भविष्याचा वेध घेणारे शिक्षण : काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्याचा वेध घेणारे
शिक्षण : काळाची गरज
भविष्याचा वेध घेणारे शिक्षण : काळाची गरज

भविष्याचा वेध घेणारे शिक्षण : काळाची गरज

sakal_logo
By

लोगो - शिक्षण ः लोकल टू ग्लोबल
--
82243
डॉ. गजानन पाटील


भविष्याचा वेध घेणारे
शिक्षण : काळाची गरज

इंट्रो
संपूर्ण जग येत्या दहा वर्षात बदलून जाणार आहे. यासाठी कोणत्या भविष्यवेत्याची गरज भासणार नाही. औद्योगिक क्रांतीनंतर झालेली तंत्रज्ञानाची क्रांती माणसाच्या जीवनात प्रचंड मोठा बदल घडवून गेली. या बदलाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाल्याशिवाय राहिला नाही. शिक्षणाच्या माध्यमातून पिढीच्या पिढी घडवली जाते. ही पिढी घडवत असताना या पिढीला भविष्यातल्या काही घटनांचा वेध घेऊन आताच सजग करण्याची वेळ आज आलेली आहे. अनेक वेळा असा एक विचार मांडला जातो की, शिक्षण म्हणजे नुसतं पाठांतर नाही तर ते समजून घेऊन त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणे होय. हा वापर जर प्रभावीपणे झाला तर कदाचित भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या या समस्या न राहता ती एक संधी राहील. त्यामुळे अखिल मानव जातीचे कल्याण होईल. त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. कोणीतरी सांगतो म्हणून बदल करण्यापेक्षा वास्तवाचा अभ्यास करून बदल केलेला अधिक चांगला होईल.
-- डॉ. गजानन पाटील
-------
संपूर्ण जगभरामध्ये पुढच्या दहा वर्षापर्यंत स्वायत्त वाहतूक किंवा ज्याला आपण चालक विरहित वाहने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून चालक विरहित वाहन रस्त्यारस्त्यावर दिसणार आहे. लोकांसाठी हे वाहतुकीचे प्राथमिक साधन होऊ शकेल. ज्यामुळे माणसाला होणारे परिश्रम वाचणार आहेत. हा भविष्याचा वेध जर आज आपण घेतला तर शालेय शिक्षणामध्ये आपण त्या दृष्टिकोनातून बदल केला पाहिजे. शिक्षणात नागरी सुरक्षा वाहतुकीचे नियम यासारख्या विषयांमध्ये मोठा बदल घडवून आणावा लागेल. तसेच येत्या वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) दैनंदिन जीवनात अधिक सामान्य होणार आहे. कार्यक्षमता आणि अचूकता सुधारण्यासाठी तिचा वापर आरोग्य सेवेपासून वित्तापर्यंत अनेक उद्योगांमध्ये केला जाणार आहे. त्यासाठी लहानपणापासून मुलांना या कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिचय करून दिला. ती कोणत्या पद्धतीने काम करते याच्याविषयी माहिती दिली तर त्याचा उपयोग त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये होईल. कदाचित त्यामुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा प्रयत्न मात्र शालेय शिक्षणापासूनच सुरू केला पाहिजे. सध्याच्या जागतिक प्रदूषणाचा प्रश्न सर्वत्र भिषण रूप धारण करत आहे. यासाठी येत्या काही वर्षांत सौर, पवन आणि भूऔष्णिक यांसारखे अक्षय ऊर्जा स्रोत अधिक प्रमाणात उपलब्ध आणि वापरले जातील. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून राष्ट्रे दूर जातील. या सर्वांचा प्रात्यक्षिकासह अभ्यास मुलांना जर दिला गेला तर मूल त्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकेल. कदाचित त्यामुळे भविष्यात होणाऱ्या जागतिक प्रदूषणाची समस्या कायमची नष्ट होईल. तसेच पुढील दहा वर्षात स्मार्ट शहर ही सर्व सामान्य शहरासारखीच असतील शहरी भागात इंटरनेट ऑफ थिंग्स (आय ओ टी) सेंसर आणि कनेक्टेड उपकरणे असतील की जी नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारतील त्यामुळे अधिक सुरक्षेची भावना आणि वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्याच्या स्मार्ट सिटीचा अभ्यास करून प्रत्येक छोटी शहरं स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. पण या बदलाचा अभ्यास मात्र अभ्यासक्रमात असणे गरजेचे आहे. तसेच येत्या काळात ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी सर्वसामान्य होईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग मनोरंजनापासून ते शिक्षणापर्यंत आणि शेतीपासून विविध उद्योगांमध्ये केला जाईल. त्यासाठी शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांमध्ये हा भविष्यवेधी दृष्टिकोन जोपासणे गरजेचे ठरणार आहे. थोडक्यात भविष्याचा वेध घेणारे शिक्षण ही काळाची गरज ठरणार आहे.
(लेखक प्रयोगशिल शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)