चिपळूण-रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू
चिपळूण-रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू

चिपळूण-रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू

sakal_logo
By

रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू

पालकमंत्री उदय सामंत ; चिपळुणात संत रोहिदास महाराज जयंती

चिपळूण, ता. १२ ः राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रोहिदास समाजाचे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहिदास समाजसेवा संघ चिपळूण या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली.
शहरातील मार्कंडीमधील रोहिदास भवनमध्ये संस्थेचे चिपळूण अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी आमदार प्रसाद लाड, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा रोहिदास समाजसेवा संघाचे अध्यक्ष सुरेश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी केले. मनोगतात चिपळूणकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संत रोहिदास महाराज जीवनचरित्र माहिती दीपक आंबोकर यांनी दिली. या वेळी रोहिदास समाजसेवा संघ चिपळूणचे पदाधिकारी मंगेश पेढांबकर, किसन चिपळूणकर, प्रकाश पेढांबकर, अनिल चिपळूणकर, सुनील चिपळूणकर, संदीप मुंढेकर, संतोष रीळकर, संदीप चिपळूणकर, अजित आंबोकर, सुरेश सावर्डेकर, समीर जानवलकर, विष्णुपंत सावर्डेकर, मुग्धा चिपळूणकर ,रसिका सावर्डेकर आदी उपस्थित होते.