
चिपळूण-खेर्डी शाळेत विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
फोटो ओळी
-rat१२p२१.jpg ःKOP२३L८२२६२
चिपळूण ः मुलांची दंत तपासणी करताना डॉ. रजत दाभोळकर.
खेर्डी शाळेत विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
चिपळूण, ता. १२ ः तालुक्यात मॉडेल स्कूल म्हणून उदयास येत असलेल्या खेर्डी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. ही शाळा तालुक्यामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व सर्वांगीण विकासासाठी या शाळेत नेहमी विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन केले जाते. खेर्डी गावचे सुपुत्र डॉ. रजत दाभोळकर व श्रुती दाभोळकर यांनी खेर्डी शाळेच्या १५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी केली. त्याचबरोबर दात व त्यांची निगा या विषयावर डॉ. रजत दाभोळकर यांचे व्याख्यानही झाले. लहान मुलांच्या दातांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दातांच्या आजारांचे अनेक प्रकार आहेत. दातांच्या आजारावर आज विविध अत्याधुनिक उपाय आहेत. त्या उपायांची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या दंत तपासणीसाठी डॉ. दाभोळकर यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापिका श्वेता कांबळी, शिक्षिका जंगम, नाईक, उपशिक्षिका भोळे, कदम, कुलकर्णी व सविता सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन सविता सूर्यवंशी यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्याध्यापक दीपक यादव व सर्व सहकारी शिक्षकांनी उत्तम नियोजन केले होते.