
साडवली-हरपुडेत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
पान 3 साठी
82340
हरपुडेत मॅरेथॉन स्पर्धा
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे मराठवाडी येथील ॐ शिवगीता स्वाध्याय मंडळ येथे महाशिवरात्र सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी (ता. १२) देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरातून शिवज्योत नेण्यात आली. तसेच खुला गट व लहान गटाच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाल्या. लहान गटात सर्वेश भेरे, रोशन आग्रे, केदार माने, स्वरुप शिंदे, संग्राम कांबळे आणि मोठ्या गटात सोळजाई मंदिर ते हरपुडे केदारेश्वर मंदिर अशी स्पर्धा घेतली गेली. यामध्ये अमेय धुळप (शिवराज अॅकॅडमी), सौरभ रावणंग (निवळी), सिद्घेश गोपाळ (पाटगाव), शुभम जाधव (प्रभानवल्ली), रोहित नाटेकर (मिठगवाणे) यांनी यश मिळवले. रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन स्पर्धकांना गौरवण्यात आले. या वेळी रघुवीर जाधव, महादेव राणे, सौरभ जाधव, पद्माकर कदम, मिलिंद सावंत, मृणाल आंब्रे, निकीता भोसले, डॉ. कविता फास्के, शरद गायकवाड, अतुल शिंदे, नितीन भोसले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.