उंबर्डेसाठी विकासकामांची निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबर्डेसाठी विकासकामांची निविदा
उंबर्डेसाठी विकासकामांची निविदा

उंबर्डेसाठी विकासकामांची निविदा

sakal_logo
By

उंबर्डेसाठी विकासकामांची निविदा
कणकवली ः उंबर्डे (ता. वैभववाडी) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्य रस्ता ते बोबडेवाडी कब्रस्तान रस्ता डांबरीकरणासाठी ४ लाख १० हजार ५०२ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कामाची एक महिना मुदत आहे. मान्यताप्राप्त नोंदणीकृत मजूर संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कामाची मागणी २० फेंब्रुवारीला सकाळी ११ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यांमध्ये आवश्यक कागदपत्रासह सादर करावयाची आहे. निविदा रक्कम दोनशे रुपये असून २१ फेब्रुवारीला निविदा खुली केली जाणार आहे.
--
भिरवंडे रस्त्यासाठी निधी
कनेडी ः भिरवंडे ग्रामपंचायत अंतर्गत दोन लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. बैद्धवाडी ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे.