साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

साडवली-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

हरपुडेत उद्या बैलगाडी स्पर्धेचा थरार
देवरूख : हरपुडे येथील केदारेश्वर क्रीडा मंडळातर्फे महाशिवरात्री सप्ताहानिमित्ताने १५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हरपुडे मराठवाडी येथील श्री सदगुरू स्वामी उदयानंदगिरी क्रीडानगरी येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला १७ हजार ७७७ रुपये आणि ढाल देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी बैलगाडी मालकाला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेविषयी माहितीसाठी सोहम माने, मिलिंद सावंत, शरद गायकवाड, ओंकार गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा.
-----
हरपुडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे मराठवाडी येथील ॐ शिवगीता स्वाध्याय मंडळ येथे महाशिवरात्र सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी (ता. १२) देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरातून शिवज्योत नेण्यात आली. तसेच खुला गट व लहान गटाच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाल्या. लहान गटात सर्वेश भेरे, रोशन आग्रे, केदार माने, स्वरुप शिंदे, संग्राम कांबळे आणि मोठ्या गटात सोळजाई मंदिर ते हरपुडे केदारेश्वर मंदिर अशी स्पर्धा घेतली गेली. यामध्ये अमेय धुळप (शिवराज अॅकॅडमी), सौरभ रावणंग (निवळी), सिद्घेश गोपाळ (पाटगाव), शुभम जाधव (प्रभानवल्ली), रोहित नाटेकर (मिठगवाणे) यांनी यश मिळवले. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून स्पर्धकांना गौरवण्यात आले. या वेळी रघुवीर जाधव, महादेव राणे, सौरभ जाधव, पद्माकर कदम, मिलिंद सावंत, मृणाल आंब्रे, निकीता भोसले, डॉ. कविता फास्के, शरद गायकवाड, अतुल शिंदे, नितीन भोसले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------

खेरवसेत १७ ला ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा
लांजा ः तालुक्यातील खेरवसे येथे १७ फेब्रुवारीला रात्री १० वा. जिल्हास्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामविकास मंडळ खेरवसेच्यावतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या ग्रुपला १० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच द्वितीय विजेत्यांना रुपये ७ हजार व सन्मानचिन्ह आणि तृतीय विजेत्या क्रमांकाला रुपये ५ हजार व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.