
प्रकल्प सहाय्यक अधिकारी संतोष गमरेंचा विशेष सत्कार
rat१३२८.txt
बातमी क्र. २८ ( पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat१३p२१.jpg-
८२४६७
रत्नागिरी ः निवेदन तथा सूत्रसंचलन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन यासाठी प्रकल्प सहाय्यक अधिकारी संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
------
प्रकल्प सहाय्यक अधिकारी गमरेंचा सत्कार
रत्नागिरी, ता. १३ : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे २७ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात झाले. यावेळी प्रकल्प साहाय्यक अधिकारी संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद स्नेहसंमेलन २०२३ नुकतेच पार पडले. यामध्ये उत्कृष्ट निवेदन तथा सूत्रसंचलन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन यासाठी प्रकल्प साहाय्यक अधिकारी संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मयुरी पाटील यांनी रोख बक्षीस दिले.