राजापूर-कोकणातील बंद दारांची समस्या स्त्रियाच सोडवतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-कोकणातील बंद दारांची समस्या स्त्रियाच सोडवतील
राजापूर-कोकणातील बंद दारांची समस्या स्त्रियाच सोडवतील

राजापूर-कोकणातील बंद दारांची समस्या स्त्रियाच सोडवतील

sakal_logo
By

फोटो ओळी(सिंगल कॉलम
-rat१३p३४.jpg-KOP२३L८२५३६
राजापूर ः बोलताना श्रद्धा कळंबटे.
------------
कोकणातील बंद दारांची समस्या स्त्रियाच सोडवतील
--
श्रद्धा कळंबटे ; महिलांच्या पुढाकारानेच बदलेल समाज
सकाळ वृत्तसेवा
गुरुवर्य स्वा. महादेव कुंडेकर साहित्य नगरी, राजापूर, ता. १३ : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले. बंद घरांच्या समस्येचे मूळ नेमकं कशामध्ये दडलं आहे यावरही त्यांनी थेट भाष्य केले.
राजापूर-लांजा तालुका नागरीक संघाच्यावतीने तालुक्यातील तळवडे येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये ‘साहित्यिक विचार’ या सत्रामध्ये कोकणच्या बंद घरांची चावी स्त्रियांच्या हाती या विषयावर कळंबटे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘शहरीकरणामुळे मुलांना खेळायला मैदाने, मोकळ्या जागा मिळत नाहीत. लहानपणीचा शेणामुताचा, आंब्याचा गंध आज आठवूनही अंगावर शहारे येतात. तो काळ पुन्हा आणून कोकणी संस्कृती आणि गावांचे चैतन्य टिकवून ठेवण्याचे आव्हान पेलण्यात महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आज सिमेंटची जंगले गावाकडे सरकायला लागली आहेत. नवनवीन शोध, नवे तंत्रज्ञान यांचा परिणाम निसर्गावर झाला. शेती ओस पडू लागली, माणसे शहराकडे धाव घेऊ लागली. बंद घरांच्या समस्येचे मूळ इथे आहे.’
मुलीच्या जन्माकडे पाहण्याच्या दृष्टीने सकारात्मक बनण्याची गरज त्यानी स्पष्ट केली. आजही मुलगी झाली तर मुलाच्या जन्माएवढा आनंद होतो का ? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी तरुणांनी हा विचार स्वीकारल्याचे दिसत असून त्याच्यातून सकारात्मक बदल दिसू लागल्याचे आशादायक निरीक्षण नोंदविले.

संसार मोडण्यास आईवडीलही जबाबदार
आपल्याकडे कुमारी मातांचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. घटस्फोटाचे अर्ज पूर्वी दहा-वीस असत आता महिन्याला शेकडो येऊ लागले आहेत. शिक्षणामुळे एक प्रकारचा अहंकार येऊ लागला आहे. संसार करायचा नाही, असे म्हणत घटस्फोट मागणाऱ्‍या मुलींचे प्रमाण वाढले आहे. संसार मोडण्यासाठी दोन्हीकडचे आईवडील जवळजवळ सत्तर टक्के जबाबदार असतात. यात बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत’ असे आवाहनही त्यांनी केले.