खेड-राष्ट्रवादीच्या माजी आमदार संजय कदमांना एसीबीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-राष्ट्रवादीच्या माजी आमदार संजय कदमांना एसीबीची नोटीस
खेड-राष्ट्रवादीच्या माजी आमदार संजय कदमांना एसीबीची नोटीस

खेड-राष्ट्रवादीच्या माजी आमदार संजय कदमांना एसीबीची नोटीस

sakal_logo
By

माजी आमदार संजय कदमांना एसीबीची नोटीस
खेड : दापोलीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीने नोटीस बाजावल्याने खळबळ उडाली आहे. माजी आमदार संजय कदम हे लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असतानाच त्यांना ही नोटीस बाजवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना संजय कदम यांनी बेकायदेशीरपणे इमारती व क्रशर उभारल्याची तक्रार झाली असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. इमारत बांधताना विहीर बुजवल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली असून माजी आमदार कदम हे या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार संजय कदम यांना ओळखले जाते.