खुनप्रकरणी पाच जणांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनप्रकरणी पाच जणांच्या 
पोलिस कोठडीमध्ये वाढ
खुनप्रकरणी पाच जणांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ

खुनप्रकरणी पाच जणांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ

sakal_logo
By

खूनप्रकरणी पाच जणांच्या
पोलिस कोठडीमध्ये वाढ
सावंतवाडी, ता. १३ ः पंढरपूर येथील सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तुषार पवार याला आज जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली, तर अन्य पाच जणांना १६ पर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली.
आबासो बाबासो पाटील, राहुल कमलाकर माने, प्रदीप विजय बळीवंत, स्वानंद भारत पाटील, राहुल बाळासाहेब पाटील अशी पाच जणांची नावे आहेत. त्यांना आज सकाळी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी, तसेच अन्य पुरावे गोळा करण्यासाठी वाढीव पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.