
संक्षिप्त
rat१४१३.txt
बातमी क्र..१३ (टुडे पान २ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat४p३.jpg ः
८२६१७
देवरूख ः कोसुंब-ताम्हाणे मार्गावर ठिकठिकाणी असे भलेमोठे खड्डे पडले आहेत.
--
कोसुंब-ताम्हाणे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
देवरूख ः कोसुंब ते ताम्हाणे रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी एक आव्हानच आहे. या रस्त्यावर एखादा बळी घेतल्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत काय? असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील नागरिक विचारत आहेत. देवरूख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंबमधून कोळंबे, वांद्री, तुळसणी, सांगवे फणसट, आंबवली, उजगाव, नांदळज, ताम्हाणे आणि धामापूर तसेच रत्नागिरीला जाण्यासाठी जो रस्ता जातो. त्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून अनेकवेळा मागणी करूनही या रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्यावर सध्या पडलेले भलेमोठे खड्डे पाहिले की, धडकी भरते. या खड्ड्यात दुचाकीस्वार जर पडला तर त्याच्या जीवावर बेतू शकते. असे असूनही संबंधित खाते या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. येत्या १५ दिवसांत या रस्त्याचे काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे
--
शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, नाणेप्रदर्शन
साखरपा ः येथील जय शिवराय तरुण मित्रमंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मंडळाचे हे सातवे वर्ष आहे. यंदा हा सोहळा तीन दिवस चालणार असून शुक्रवारी पहिल्या दिवशी गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी जुन्या नाण्यांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यात शिवकालीन नाण्यांचा समावेश असणार आहे. दरवर्षीप्रमाणे विशाळगडावरून शिवज्योत साखरपा येथे आणण्यात येणार आहे. शनिवारी ही ज्योत सकाळी विशालगडावरून निघेल आणि सायंकाळी साखरपा बाजारपेठेत येईल. रविवारी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. वसंतराव चौगुले स्मृती रुग्णालय, दाभोळे यांच्या सौजन्याने हे शिबिर पार पडेल तसेच त्याच दिवशी स्वराज्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, व्याख्यान आणि शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.
--
फोटो ओळी
-rat१४p७.JPG-
८२६५२
दापोली ः कोळबांद्रे शाळेला औषधी वनस्पती भेट देणारे संजय पवार, मुख्याध्यापक मंगेश कडवइकर व विद्यार्थी.
--
कोळबांद्रे कुंभारवाडी शाळेत औषधी बागेची निर्मिती
गावतळे ः लहानांपासून मोठ्यांना वेगवेगळे आजार होत असतात. ताप, सर्दी, खोकला, खाज, खरुज यासारख्या आजारांवर पूर्वी घरगुती उपाय केले जायचे. आजीच्या बटव्यात वेगवेगळी औषधे असायची. त्याने आजार बरे व्हायचे. तो बटवा आता काळाच्या ओघात हरवला. साधा सर्दी-खोकला आला तरी हल्ली खासगी दवाखान्यात धाव घेतली जाते. पूर्वी अशा आजारांवर घरगुती उपाय केले जायचे कारण, प्रत्येकाच्या घराच्या आजुबाजूला औषधी वनस्पती असायच्या. त्या आता दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जि. प. शाळा कोळबांद्रे कुंभारवाडी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कडवईकर यांना अभिनव कल्पना सुचली व शाळेतच औषधीबागेची निर्मिती करण्याचे ठरवले जेणेकरून शाळेत येणाऱ्या मुलांना लहानपणापासूनच औषधी वनस्पतींची ओळख व त्यांचे उपयोग माहिती होतील. या संकल्पनेला जोड दिली ती पर्यावरणाची आवड असणारे सहशिक्षक माधव तिरुके यांनी. औषधी बागेच्या निर्मितीमध्ये व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पादड, उपाध्यक्षा रूपाली पडवेकर, शिक्षणतज्ञ अंकुश कोळबांद्रेकर व सर्व कमिटीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले. महत्वाचे आणि मोलाचे काम केले ते कोकणकृषी विद्यापिठाचे कर्मचारी संजय श्रीपतराव पवार यांनी. पर्यावरणप्रेमी या व्यक्तीने वडिलांच्या स्मरणार्थ २५ औषधी वनस्पतींची रोपे मोफत शाळेला दिली. त्यांच्याच हस्ते रोपांची लागवड करण्यात आली.
---