
साहित्यिकांनी विचाराला बांधून घेऊ नये
rat१४२३.txt
बातमी क्र..२३ (टुडे पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat१४p१९.jpg ः
८२६७१
राजापूर ः कवी अरुण इंगवले यांची मुलाखत घेताना धीरज वाटेकर.
--
लहान संमेलने घेतल्यास खेड्यांमध्ये क्रांती
अरुण इंगवले ; साहित्यिकांनी विचाराला बांधून घेऊ नये
राजापूर, ता. १४ ः साहित्यिक, विचारवंतांनी कुठल्याही विचाराला बांधून घेऊ नये. मध्यम मार्ग कोणता यावर चिंतन व्हायला हवे. मी लिहिले म्हणजे लगेच क्रांती होईल या मताचा मी नाही. बदलाची गती लक्षात न येण्यासारखी, कासवासारखी असते. आपण लिहित राहिले पाहिजे, असा मौलिक सल्ला चिपळूण येथील कवी अरुण इंगवले यांनी दिला.
तळवडे येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात धीरज वाटेकर यांनी इंगवले यांची प्रकट मुलाखत घेतली. मोठ्या संमेलनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लहान लहान साहित्य संमेलने घेतली तर २७ हजार खेड्यांमध्ये केवढीतरी क्रांती करता येईल, असे मतही इंगवले यांनी मांडले. ते म्हणाले, दोनच महिने मी पहिलीच्या वर्गात बसलो नंतर दुसरीत. प्रत्येक समारंभात भाषण वगैरेमध्ये पुढे असे. कॉलेजमध्ये आल्यावर काहीसा न्यूनगंड; पण ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव असल्याची ताकद लक्षात आली. ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून मला माझी ताकद वाटते. छंदोबद्ध आणि छंदमुक्त कविता याबद्दल बोलताना त्यांनी पहिल्या संग्रहातील कविता छंदोबद्ध, ‘आबूट घेऱ्यात’ मध्ये मुक्त छंदात कविता लिहिल्या. मला छंदोबद्ध प्रकार आवडतो; पण आशयाच्या, अभिव्यक्तीच्या मागणीप्रमाणे कविता लिहिली जाते असेही स्पष्ट केले. ‘पावसाची बायको’ ही आवडती कविता असल्याचे सांगताना ‘पावसाची बायको’ कविता सांगलीच्या काही भागातील दुष्काळी परिस्थितीवरून सुचली. पावसाला बायको असती तर त्याच्या बेभरवशीपणाबद्दल ‘कडमडत असतील कोकणात, तिथं नसतील तर सापडतील चेरापुंजीत’ असे म्हणाली असती, अशी कल्पना यात मांडली आहे.
-----
कवितेमध्ये अल्पाक्षर रमणीयता हवी
असेल नसेल ते गोळा करून छापणे म्हणजे कवितासंग्रह नव्हे, असेही इंगवले यांनी सांगितले. कवितेमध्ये अल्पाक्षर रमणीयता पाहिजे, एकही वावगा शब्द कवितेला चालत नाही. कालसुसंगता हवी, कालबाह्य विषयावर लिहिलेली कविता त्याच क्षणी मेलेली असते असेही अरुण इंगवले यांनी सांगितले.