जिव्हाळ्यामुळेच ‘स्नेहबंध’चे लिखाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिव्हाळ्यामुळेच ‘स्नेहबंध’चे लिखाण
जिव्हाळ्यामुळेच ‘स्नेहबंध’चे लिखाण

जिव्हाळ्यामुळेच ‘स्नेहबंध’चे लिखाण

sakal_logo
By

जिव्हाळ्यामुळेच ‘स्नेहबंध’चे लिखाण

अजय कांडर ः वासंती किणीकरांच्या पुस्तकाचे प्रकाशन

मालवण, ता. १४ ः सध्याच्या नातेसंबंध कोरडे होत चाललेल्या काळात वासंती किणीकर यांनी आपले गुरुवर्य आणि सहकारी शिक्षक यांच्याबद्दल अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहपुर्वक संबंध उलगडून सांगणारे स्नेहबंध हे पुस्तक लिहीले ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. मुळात त्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा असल्यामुळेच त्यांच्याकडून हे लिखाण होऊ शकले, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी कट्टा येथे केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका किणीकर लिखित गुरुजन आणि सहकारी शिक्षक अशा ४१ व्यक्तीमत्वांबद्दल कृतज्ञता मांडणारे ‘स्नेहबंध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साहित्यिक, कवी कांडर यांच्या हस्ते वराडकर हायस्कूलच्या सभागृहात झाला. व्यासपीठावर लेखिका श्रीमती वासंती किणीकर, संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष तथा सरपंच शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, सहसचिव साबाजी गावडे, संचालक शिवराम गुराम, महेश वाईरकर, स्वाती वराडकर, पेंडूर हायस्कूल संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, बॅ. नाथ पै सेवांगणचे प्रमुख कार्यवाह दिपक भोगटे, कवयित्री व लेखिका तांबे श्रीमती विजयश्री देसाई, स्कूल कमिटी चेअरमन बापू वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल फणसेकर, माजी मुख्याध्यापक सर्जेराव पाटील, सुरेश कदम, वराडकर काॅलेजचे प्राचार्य जमदाडे, इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक तसेच माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘स्नेहबंध’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी नुकतेच २५० बालकलाकारांचा सहभाग असलेले शिवचरित्रावरील महानाट्य यशस्वीरीत्या सादर केल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी गौरव केला.