रत्नागिरी ःवारीशे अपघात प्रकरणी 12 जणांची एसआयटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ःवारीशे अपघात प्रकरणी 12 जणांची एसआयटी
रत्नागिरी ःवारीशे अपघात प्रकरणी 12 जणांची एसआयटी

रत्नागिरी ःवारीशे अपघात प्रकरणी 12 जणांची एसआयटी

sakal_logo
By

पान १ साठी

वारीशे मृत्यू प्रकरणी ‘एसआयटी’
---
तांत्रिक, प्रत्यक्ष तपासावरही भर; प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा शोध
रत्नागिरी, ता. १४ ः पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस दलाने मोठे पाऊल उचलले आहे. या खून प्रकरणात १२ जणांच्या ‘एसआयटी’ची (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) स्थापना केली असून, स्वतंत्र तपास सुरू झाला. तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपासावरही भर देत खोलवर तपास केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाडही उपस्थित होत्या.
कोदवली येथील पेट्रोलपंपावर गाडीत पेट्रोल भरून निघालेले पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५, रा. कशेळी) यांच्या दुचाकीला एका मोटारीने धडक दिल्याने वारीशे गंभीर जखमी झाले आणि उपचारांदरम्यान यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करण्यात आला. ज्याने धडक दिली, त्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याने खून करण्याच्या उद्देशानेच मोटार अंगावर घालून शशिकांत यांना मारले, असा आरोप करण्यात आला. रिफायनरी विरोधक आणि समर्थक असे दोन गट असल्याने राजापुरात वातावरण कमालीचे तंग झाले होते. रिफायनरी विरोधकांनी शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूचा विषय उचलून धरला. वातावरण तापत गेल्यावर भारतीय दंडविधान ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात स्थानिक पातळीसह राज्यस्तरावर याचे पडसाद उमटले. विरोधकांनी तर हा विषय उचलून धरत यामागे नेमके आहे कोण? याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तत्काळ १२ जणांच्या ‘एसआयटी’ची स्थापना केली. त्यात पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि काही अंमलदारांचा समावेश आहे. या प्रकरणात आता साक्षीदार, पंच घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर तांत्रिक पुरावे मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल सीडीआरसह परिसरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण आहे का, याची चाचपणीही आता पोलिसांकडून केली जात आहे. हा अपघात नसून, खूनच आहे, हे पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरेल. त्यासाठी काही तज्ज्ञांची मदत पोलिसांनी तपासात घेतली आहे.

डीव्हीआर ताब्यात घेतले
या प्रकरणात अपघातस्थळासह आजूबाजूच्या परिसरात ज्या-ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले होते, तेथील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या डीव्हीआरमधूनच पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोट
तपास योग्य दिशेने
शशिकांत वारीशे यांच्या खून प्रकरणात आमचा तपास योग्य दिशेने चालला आहे. शशिकांत यांना न्याय मिळेल, या दृष्टीने आम्ही पुरावे गोळा करीत आहोत. तपासाबाबत कोणतीही शंका नसावी.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक