वारीशे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारीशे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी
वारीशे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी

वारीशे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी

sakal_logo
By

rat१४४९.txt
(पान ३ साठी)

वारीशे प्रकरण सीबीआयकडे द्या

खासदार राऊत ; आंबेरकरने १३३ परप्रांतियांना विकली जमीन

रत्नागिरी ता. १५ : बारसू येथील जागा १३३ परप्रांतियांना विकून पैशाची मस्ती चढलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याने रिफायनरी गेली तर आपले अब्जोपती होण्याचे स्वप्न भंग होईल म्हणून पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केली असा आरोप रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केला. या प्रकारणात आंबेरकरला मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करुन हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी ही त्यांनी केली. मंगळवारी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते, आमदार डॉ.राजन साळवी उपस्थित होते.

खासदार राऊत यांनी पोलीस अधिक्षकांच्या भेटीत संशयित आंबेरकर याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. राऊत म्हणाले, आंबेरकर हा रिफायनरीचा भू माफिया होता. दहा-बारा जणांचे टोळके घेऊन बारसू पंचक्रोशीतील पाच गावांमध्ये दहशत पसरवून स्थानिकांच्या जागा त्याने बळकावल्या होत्या. त्याच जागा परराज्यातील १३३ धनदांडग्यांना विकण्यात आल्या आहेत. प्रकल्पाचे नोटीफिकेशन झाल्यानंतर त्या भागातील जागेचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येत नाही. अत्यावश्यक कामासाठी जागा विकायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. परंतु बारसू येथील जागांची अजुनही विक्री होत आहे. यामागे कोणाचा हात आहे याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. विरोध करतील त्यांना संपावयाचे असा एककलमी कार्यक्रम पंढरीनाथ आंबेरकर याच्यासह त्याच्या टोळक्याने सुरू केला होता. त्यातूनच पत्रकार शशिकांत वारिशे यांचा हकनाक बळी गेला. सिंधुदुर्ग येथे गृहमंत्री फडणवीस यांनी रिफायनरी होणारच अशी गर्जना देऊन समर्थन करणाऱ्या या टोळक्याला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन दिले होते. त्यामुळेच आंबेरकरने एका पत्रकाराला मारण्याचे धाडस केले.
---
आम्ही मदतीचा डांगोरा पिटणारे नाही
दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना खासदार म्हणून आपण व शिवसेनेने मदत केली आहे. आम्ही मदतीचा डांगोरा पिटणारे नाहीत, आम्ही स्वतःच्या खिशात हात घालूनच मदत करतो. परंतु सरकारने जाहीर केलेली २५ लाखांची मदत वारिशे कुटुंबांना सरकारने तात्काळ देणे आवश्यक आहे. स्वतःच्या खिशात हात न घालता सरकारी मदत तरी वेळेवर द्या, असा टोला खासदार राऊत यांनी पालकमंत्री सामंत यांना लगावला.