
न्यायाधीशांसह ६६ जणांचे ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त रक्तदान
82808
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा न्यायालयात आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित न्यायाधीश, वकील संघटना पदाधिकारी आदी.
न्यायाधीशांसह ६६ जणांचे ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त रक्तदान
सिंधुदुर्गनगरीतील शिबिरास प्रतिसाद; सामाजिक बांधिलकीतून विधायक उपक्रम
ओरोस, ता. १४ ः जिल्हा व सत्र न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी रक्तदान करून या उपक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी ६६ जणांनी रक्तदान केले. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश डी. बी. म्हालटकर, जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे, गोवा व महाराष्ट्र बार कौन्सिल उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, अॅड. उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील संदीप राणे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी, अॅड. अमोल सामंत, अॅड. यतिश खानोलकर, कोर्ट व्यवस्थापक प्रशांत मालकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी अपघातांचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. अपघातग्रस्तांना वेळीच रक्त न मिळाल्याने काही वेळा जीवही गमवावा लागतो. अशी परिस्थिती निर्माण होऊन रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम घेण्यात आल्याचे जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अॅड. रावराणे यांनी सांगितले. यावेळी स्वतः रक्तदान करून न्यायाधीशांनी वेगळा आदर्श घालून दिला. जिल्हा न्यायाधीश भारुका, मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे, अॅड. संग्राम देसाई, अॅड. रुपेश देसाई, अॅड. यतिश खानोलकर, अॅड. गजानन तोडकरी आदींसह न्यायालयीन अधिकारी कर्मचारी मिळून ६६ जणांनी रक्तदान केले.