Tue, March 28, 2023

विनयभंग प्रकरणी आरोपीला कारावास
विनयभंग प्रकरणी आरोपीला कारावास
Published on : 14 February 2023, 2:59 am
विनयभंग प्रकरणी
आरोपीला कारावास
कणकवली,ता. १४ ः एका महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे वकील नितीन कुंटे व तात्कालीन सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. सूर्यकांत चव्हाण (वय ३५ रा. ओरोस), असे आरोपीचे नाव आहे. कणकवली पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. शेख यांनी दोषी धरून आरोपीस सश्रम कारावास व एकूण ५ हजार रूपये दंड, अशी शिक्षा सुनावली. पोलिस उपनिरीक्षक शितल पाटील व पोलिस नितीन बनसोडे यांनी या प्रकरणी तपास केला.