
माने अभियांत्रिक महाविद्यालयाने पटकावली चॅम्पियनशीप
rat१५१६.txt
बातमी क्र..१६ (पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१५p६.jpg ः
८२९०५
रत्नागिरी ः राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टेक कार्निवल २के२३’ मध्ये जनरल चॅम्पियनशिप.
--
माने महाविद्यालयाने पटकावली चॅम्पियनशीप
टेक कार्निवल ; आठ पारितोषिकांची कमाई
रत्नागिरी ः आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या टेक कार्निवल २K२३ या राष्ट्रीय स्तरावरील फेस्टिवलमध्ये जनरल चॅम्पियनशीप प्राप्त करत यश संपादन केले. या स्पर्धेत कोडिंग आयटी, वेबसाईट डेव्हेलपमेंट, पीपीटी प्रेझेंटेशन, व्हिडिओ मेकिंग तसेच क्विझसारख्या विविध स्पर्धाप्रकारांचा समावेश होता. यामध्ये महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व एमएमएस विभागातील ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धांमध्ये मनोज गोठणकर याने वेबसाईट डेव्हेलपमेंटमध्ये प्रथम, यश सावर्डेकर व आदित्य पत्याने यांनी क्विझमध्ये प्रथम तर सर्वेश बाईंग, सुधीर चारकरी यांनी क्विझमध्ये द्वितीय व चैतन्य राजवाडे व मैत्रेय जुवेकर यांनी क्विझमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. मानव जाधव व आदित्य पत्याने यांनी कोडिंग आयटीमध्ये तर शकीर धामसकर याने पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये उत्तेजनार्थ यश संपादन केले. हा कार्यक्रम देवरूख येथील आठल्ये-सप्रे महाविद्यालयात झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची दोन, द्वितीय क्रमांकाची दोन, तिसऱ्या क्रमांकाचे एक व उत्तेजनार्थ तीन अशी एकूण आठ पारितोषिके प्राप्त केली. देवरूख शिक्षण प्रसारक संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा एकूण सहभाग व मिळवलेल्या एकूण पारितोषिकांच्या आधारे माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्पर्धेची जनरल चॅम्पियनशीप बहाल करण्यात आली.