
शिक्षकांची कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई
rat१५२२.txt
बातमी क्र..२२ ( पान २ साठी)
फोटो ओळी
-Rat१५p११.jpg ः
८२९२८
कळसुबाई ः महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर कळसुबाईची यशस्वी चढाई करणारे नूतन विद्यामंदिरचे शिक्षक.
--
शिक्षकांकडून कळसुबाई शिखर सर
नूतन विद्यामंदिर; राज्यातील सर्वोच्च शिखर
मंडणगड, ता.१६ ः मंडणगड तालुक्यातील नूतन विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर कळसुबाईची यशस्वी चढाई करत मोहीम फत्ते केली. विशेष म्हणजे ही मोहीम अवघड मार्ग निवडीत पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसुबाईची उंची १६४८ मीटर म्हणजे ५४३१ फूट. प्रत्येकाला शिखर चढण्याची, त्याच्या माथ्याला स्पर्श करण्याची इच्छा असते; पण त्यातील आव्हानामुळे साऱ्यांनाच ही चढाई शक्य होत नाही. मंडणगडातील नूतन विद्यामंदिर या एकाच शाळेतील शिक्षकमित्रांनी मात्र अशा या उत्तुंग शिखरावर जाण्याचा चंग बांधला. १२ फेब्रुवारीला ही चढाई करण्यात आली. शाळेत कार्यरत असणारे मूळच्या सहा वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुहास रांगले, शिवप्रसाद हात्ते, दत्तात्रय जाधव, किशोर आंधळे, गोविंद मुंढे आणि विष्णू चोथवे हे शिक्षक सहभागी झाले. एरवी कळसुबाई शिखरास भेट देणारे पर्यटक बारी या पायथ्याशी असणाऱ्या गावातून चढाई सुरू करून त्याचमार्गे परत खाली उतरतात; पण या शिक्षकांच्या चढाईचे वैशिष्ट्य असे की, ही चढाई सोपी वाटणाऱ्या पण अत्यंत खडतर असणाऱ्या बारशिंगवे-वासाळी गावाच्या दिशेकडून करण्यात आली. या सर्व गिर्यारोहकांनी बारी गावाच्या दिशेने उतरत नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून पूर्ण पायी प्रवास करून कळसुबाई शिखराची परिक्रमा केली.