
कडवई स्थानकावर ना फलाट, ना पाणी
rat१६१७.txt
बातमी क्र..१७ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१६p१०.jpg-
८३१५३
संगमेश्वर ः कडवई रेल्वे स्थानकावरील पाणपोईला नळच लावलेले नाहीत.
--
कडवई स्थानकावर ना फलाट, ना पाणी
कोकण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष ; बसण्याची आसनेही गायब
संगमेश्वर, ता. १६ ः तुम्ही कोकणात आला तर संगमेश्वर तालुक्यातील कडवई रेल्वेस्थानकाचे नाव ऐकलं असेल. स्थानक म्हटले की, सुसज्ज इमारत, फलाट, आसनव्यवस्था असते; परंतु हे स्थानक पाहाल तर चकीत व्हाल. कारण, या स्थानकाला फलाटच नाही. अत्यंत गलिच्छ अवस्थेत असलेल्या या स्थानकामध्ये साध्या एसटीच्या बसथांब्यांइतकीही सुविधा नाही. त्यामुळे जाणूनबुजून प्रशासन कडवई स्थानकाबाबत कडवाई करते का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
संगमेश्वर भागातील कडवई परिसरात हजारो नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे या भागात स्थानक उभारले जावे, अशी भूमिका मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी मांडली होती. त्यांनी जनआंदोलनही उभारले. त्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने या भागात कडवई स्थानक उभारले. निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन आणि कडवई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्यासोबत नुकतीच कडवई रेल्वेस्थानकाची पाहणी केली. सोबत येथील व्यापारी व ग्रामस्थही हजर होते. रेल्वेस्थानकात सर्व ठिकाणी असुविधा दर्शनास आली. निवारा शेड आहे, परंतु त्यात बसण्यासाठी आसनेच नाहीत. सार्वजनिक पाणपोई असून अतिशय अस्वच्छता व नळाला पाणी नसणे, स्थानकाला जोडणारा रस्ता अतिशय खराब व उखडलेला आहे अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. रेल्वेफलाट अतिशय खाली असून, त्याचा प्रवाशांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
--