सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती
सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती

सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती

sakal_logo
By

rat१६१९.txt

बातमी क्र..१९ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१६p९.jpg ः
८३१५२

देवरूख ः ताम्हाने हायस्कूलला दोन लाखांची देणगी देताना सप्रे कुटुंबीय.
----
ताम्हाणे हायस्कूलला दोन लाखांची देणगी

सप्रे कुटुंबीय ; आई-वडिलांच्या स्मरणार्थ भावंडांची वचनपूर्ती

देवरूख, ता. १८ ः ताम्हाणे माध्यमिक विद्यामंदिरचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झाला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच दरम्यान आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. धामापूरचे माजी सरपंच (कै.) केशव (नाना) सप्रे व त्यांची पत्नी (कै.) वासंती सप्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनीही मदतीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत आज दोन लाखाची देणगी शाळेला देण्यात आली
प्रशालेचे माजी विद्यार्थी उद्योजक सुनील सप्रे, कल्पना (मुग्धा) सप्रे-पित्रे, ज्योती सप्रे-हर्डीकर, संध्या सप्रे-जोशी यांनी आपल्या आई -वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला माजी विद्यार्थी मेळाव्यात दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. शाळेची इमारत जुनी झाल्याने तिची दुरुस्ती करण्यासाठी निधीची कमतरता भासत होती. सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त देणगी देऊन इमारत दुरुस्तीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सप्रे कुटुंबातील या भावंडानी देणगी जाहीर केली. ही देणगी सुनील सप्रे आणि कल्पना सप्रे-पित्रे यांनी संस्थाध्यक्ष अशोक सप्रे यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष अनंत कुळे, संचालक प्रभावळकर, मुख्याध्यापक चोरमाले, सहाय्यक शिक्षक अभिजित सप्रे, गणेश माईन, जाधव उपस्थित होते.