चिपळूण - वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हवी सिग्नल यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हवी सिग्नल यंत्रणा
चिपळूण - वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हवी सिग्नल यंत्रणा

चिपळूण - वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हवी सिग्नल यंत्रणा

sakal_logo
By

(टुडे पान १ मेन, ग्राफीक)

फोटो ओळी
-rat१६p२०.JPG ः KOP२३L८३१७६व - चिपळूण ः येथील बहादूरशेख नाका येथे नेहमी वाहनांची वर्दळ असते.
-rat१६p२१.JPG ः KOP२३L८३१७७ - बंद अवस्थेत असलेली शहराची सिग्नल यंत्रणा.
-rat१६p२२.JPG ः -- KOP२३L८३१७८ चिंचनाका येथे पोलिस कर्मचारी आणि त्याला थांबण्यासाठी पोलिस छत्रीची आवश्यकता आहे.
-rat१६p२३.JPG ः KOP२३L८३१७९ अजित चव्हाण
--------------

चिपळुणातील वाहतूक कोंडी--लोगो

वाहतूक व्यवस्थेसाठी हवी सिग्नल यंत्रणा

नाक्यावर पोलिसांची नेमणूक गरजेची ; पोलिस चौक्यांचाही अभाव

चिपळूण, ता. १६ ः शहर वाढत नाही; मात्र शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे; मात्र वाहूतक पोलिसांना विविध चौकांत आणि मुख्य रस्त्यावर थांबण्यासाठी पोलिसचौक्या नाहीत. सिग्नलची यंत्रणा नाही. उन्हाळा असो किंवा पावसाळा पोलिस रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसून येतात. कधी वाहतुकीला शिस्त लावताना तर कधी दंडात्मक कारवाई करताना. शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नसल्याने त्याचा ताण पोलिसांवर पडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा.

- मुझफ्फर खान, चिपळूण
---------

बहादूरशेख नाका

बहादूरशेख नाका येथे सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका सर्कल आहे. येथे खेडकडे जाणारा आणि सावर्डेच्या दिशेने जाणारा एक मार्ग बंद आहे. एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असल्यामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे जुनी पोलिसचौकी तोडण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिसांना थांबण्यासाठी कंटेनरची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. हे कंटेनर असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. कारण, या कंटेनरमध्ये प्रचंड गरम होते. गरम होत असल्यामुळे सकाळी दहानंतर त्यात थांबता येत नाही.
------------
चिंचनाका
शहरातील चिंचनाका हा मुख्य रहदारीचा मार्ग आहे. हा शहरातील मुख्य सर्कल असल्यामुळे येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. दिवस उजाडल्यानंतर येथील वाहतूककोंडीला सुरवात होते. पूर्वी येथे सकाळी आणि सायंकाळी पोलिस असायचे. आता चिंचनाक्यात पोलिसांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. येथे वाहतूक पोलिसांची चौकी नाहीच त्याशिवाय पोलिसही नसतात. त्यामुळे अनेक वाहनचालक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करून खरेदीला जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. येथे सिग्नल यंत्रणा उभारली किंवा वाहतूक पोलिस उभे केले तर वाहतुकीला शिस्त लागेल.
------------
पॉवरहाऊस नाका

मुंबई-गोवा महामार्गावर पॉवरहाऊस नाका आहे. त्याला पागनाका असेही म्हणतात. येथे शहरात प्रवेश करण्यासाठी एक मार्ग आहे. दुसरा मार्ग पाग भागाकडे जातो. येथे एसटीसह खासगी वाहने वळतात तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. महावितरणचे कार्यालयसुद्धा येथेच आहे. एखादे वाहन शहरात किंवा पाग भागाकडे प्रवेश करत असेल आणि त्याचवेळी भरधाव वेगाने महामार्गावरून वाहन आले तर दोन्ही वाहनचालकांचा अंदाज चुकला तर येथे अपघात होतात. येथे दुचाकीस्वारांचा अनेकवेळा अपघात झाला आहे. पॉवरहाऊसपासून हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे आहे. येथील अपघात कमी करणे आणि भरधाव वेगाने येणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणेची गरज आहे.
-----------
शहराची जबाबदारी चार वाहतूक पोलिसांवर
शहरातील मुख्य बाजारपेठेत पद्माचित्र मंदिरच्या परिसरात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. शहराची वाहतूक यंत्रणा संभाळण्यासाठी तेथे केवळ चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यात एक पुरुष आणि तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
----------
इथे थांबतात वाहतूक पोलिस
पालिका परिसर, पद्माचित्र मंदिर परिसर, नाथ पे चौक, भेंडीनाका, गांधीचौक, बहादूरशेख नाका आणि चिंचनाक्यात चिपळूण पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक कर्मचारी नेमलेला असतो. बहादूरशेख नाका येथे वाहतुकीचा प्रश्न मोठा असल्यामुळे येथे महामार्ग विभागाचे दोन पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी असतात.

-----------
इथे हवेत वाहतूक पोलिस
गुहागरनाका, जुने बसस्थानक, फरशीतिठा, जिप्सी कॉर्नर परिसर, नाईक कंपनी पूल, डीबीजे महाविद्यालय परिसर, गुहागर बायपास रोड, उक्ताड सर्कल.
-------------
कोट
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पूर्वी कंट्रोल केबिनच्या बाजूला पोलिसांची चौकी होती. बसस्थानकाचे काम सुरू केल्यापासून येथील चौकी तोडण्यात आली. त्यानंतर येथे पोलिस थांबणे बंद झाले आहे. पोलिस नसल्याचा आणि गर्दीचा गैरफायदा घेत बसस्थानकावर चोरीच्या अनेक घटना घडतात; मात्र त्या उघड नसल्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे जाणेच बंद केले आहे.
- अजित चव्हाण, खेर्डी
------------
कोट
चिपळूण शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तसेच चिपळूण पोलिस ठाण्याचे कर्मचारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. होमगार्ड आणि महामार्ग विभाग पोलिसांचीही मदत घेतली जाते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बहादूरशेख नाक्यावर प्रचंड कोंडी होते. रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली तर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीचीही मदत घेतली जाते. नागरिकांनी सहकार्य केल्यास त्यातून मार्ग निघेल.

- दत्ता शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, रत्नागिरी