Sun, March 26, 2023

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा
Published on : 16 February 2023, 12:58 pm
पान 3 साठी
अपहारप्रकरणी वाहकावर गुन्हा
देवरूख ः एसटी बसच्या तिकिटातून जमा झालेली रक्कम देवरूख आगारात जमा न करता ३१ हजार ७४५ रोख रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पैशाचा अपहार केल्याप्रकरणी कंडक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत नामदेव चौगुले (40, रा. पन्हाळा, कोल्हापूर, सध्या देवरूख एसटी स्टॅण्डमागे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंडक्टरचे नाव आहे. याबाबतची फिर्याद देवरूख आगाराच्या वाहतूक निरीक्षक वंदना दिलीप काजरोळकर (सावर्डे, चिपळूण) यांनी देवरूख आगारात दिली. त्यानुसार कंडक्टर भरत याच्यावर भादंवि कलम ४२०, ४०९ नुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.