खेड ः फळांच्या दुकानामध्ये आढळला हरणटोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः फळांच्या दुकानामध्ये आढळला हरणटोळ
खेड ः फळांच्या दुकानामध्ये आढळला हरणटोळ

खेड ः फळांच्या दुकानामध्ये आढळला हरणटोळ

sakal_logo
By

-rat16p28.jpg ःKOP23L83226 खेड ः खेड येथे फळांच्या दुकानामध्ये आढळलेला हरणटोळ साप.

खेडमधील फळांच्या दुकानात आढळला हरणटोळ
खेड, ता. १६ ः खेडमधील तळ्याचे वाकण येथील दानिश बागवान यांच्या फळाच्या दुकानामध्ये बुधवारी हरणटोळ (निमविषारी) प्रजातीचा साप असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला दिली. कळवलेल्या माहितीच्या अनुषंगाने या हरणटोळ प्रजातीच्या सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून जीवनदान देण्यात आले.
या बचावकार्यात वनरक्षक खेड बर्गेकर यांनी सर्वेश पवार, सुरज जाधव, श्वेत चोगले यांच्या मदतीने हरणटोळ प्रजातीच्या सापाला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरचे बचावकार्य वैभव बोराटे परिक्षेत्र वनाधिकारी, दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक खेड बर्गेकर यांनी सर्वेश पवार, सुरज जाधव, श्वेत चोगले यांच्यासमवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तत्काळ माहिती देण्याकरिता वनविभागाचा टोल फ्री क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.