
मृत गवाची परस्पर विलेव्हाट, एकाविरुद्ध गुन्हा
rat१६८.txt
(पान ३ साठी)
मृत गवाची परस्पर विलेव्हाट
रत्नागिरी, ता. १६ ः संगमेश्वर तालुक्यातील नायरी तियरे पवार कोंड येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला होता. त्या रानगव्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी वनविभागाने एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून देवरूखचे वनपाल तोफिक मुल्ला यांनी १४ फेब्रुवारीला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही घटना ८ फेब्रुवारीला इस्माईल पाटणकर यांचे बागेमध्ये घडली. चौकशी दरम्यान पवार कोंड येथील रुपेश पवार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे कृत्य केल्याचे मान्य केले. त्यावरून वनपालांनी वन्यजीव सरंक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रुपेश पवार फवारणीसाठी बागेमध्ये गेले असता त्यांना विहिरीमध्ये गवा मृतावस्थेत दिसला. त्यांनी मजुरांकडून हा गवा विहिरीबाहेर काढून लगतच्या जमिनीमध्ये पुरल्याचे सांगितले. याचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार करत आहेत.