

rat१७१५.txt
बातमी क्र.. १५ (पान २ साठी)
११ फेब्रुवारी टुडे पान तीन
इये साहित्याचिये नगरी ..........लोगो
फोटो ओळी
-rat१७p२.jpg -
८३३६१
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
-rat१७p५.jpg ः
८३३६४
प्रकाश देशपांडे
--
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू
जणूकाही आकाशातील नक्षत्र दिव्यांनी तेजाळलेल्या कविता ज्या कवीच्या हाती दिल्या तो कवी म्हणजे आरती प्रभू उर्फ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. खानोलकरांचा जन्म ८ मार्च १९३० ला वेंगुर्ला तालुक्यातल्या बाग्लांच्या रार्इत झाला. वडिलांचे किराणा मालाचे लहानसे दुकान होते. दुकान नुकसानीत आल्यामुळे टाळे लागले. त्यांनी कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी अशा गावातून खानावळ सुरू केली. खानोलकरांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडीला सुरू झाले आणि प्लेगची साथ आली. सर्व कुटुंब कबिला घेऊन वडील परत बाग्लांच्या रार्इत आले. १९४६ ला खानोलकर शिक्षणासाठी मुंबर्इला गेले आणि परत येऊन कुडाळच्या हायस्कुलात शिकू लागले म्हणजे मॅट्रिक नापास झाले. पुढे १९६० ला पुन्हा परीक्षेला बसले आणि उत्तीर्ण शिक्का मिळाला.
वडिलांच्या निधनानंतर १९५१ ला मातोश्रींनी कुडाळ येथे वीणा गेस्टहाऊस म्हणून लॉजिंग आणि बोर्डिंग सुरू केले. फारसे चालत नव्हते; पण खानोलकर गल्ल्यावर बसून सातत्याने काहीतरी लिहित असत. तिथेच आलेल्या कुणा अनामिकांनी त्यांच्या कविता त्यांना नकळत उचलल्या. अनमिकांनी त्या कवितांवर ‘आरती प्रभू’ असे नाव व खानोलकरांचा पत्ता घालून त्या सत्यकथेकडे पाठवल्या. सत्यकथेत त्यांची कविता प्रसिद्ध झाली आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर असे काहीसे ऐतिहासिक वाटणारे नाव बदलून हा कवी आरती प्रभू झाला अशी कथा सांगतात. त्यापूर्वी ‘बालार्क’ मासिकात त्यांची कविता प्रसिद्ध झाली होती; मात्र सहित्यप्रांती विलक्षण दबदबा असलेल्या सत्यकथेत त्यांची कथा आणि कविता प्रसिद्ध झाल्याने सहजच सर्वांचे लक्ष वेधले गेले. १९५८ ला मालवणला अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांनी कविता वाचली आणि तिथेच त्यांच्या ‘पल्लवी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही झाले.
१९५९ ला मुंबर्इ आकाशवाणीला स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरीला लागले; मात्र त्यांच्या कविता विद्रोही वगैरे असल्याचा आकाशवाणीला दृष्टांत झाला. ते साम्यवादी असल्याचे ठरवले गेले आणि १९६१ ला त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. या काळात त्यांनी‘ रहस्यरंजन’ मासिकात ‘झाडे नग्न झाली’ ही कादंबरी लिहिली नंतर लघु कादंबरी भर घालून त्यांनी रात्रकाळी घागरकाळी ही कादंबरी लिहिली आणि १९६३ ला मौज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली.
खानोलकर मुंबर्इत राहिले; मात्र मनाने ते सदैव कोकणातच असत. इथल्या निसर्गात ते मनाने सदैव रमले. त्यांच्या कवितांमधून कोकणातला निसर्गच शब्दरूपाने आला आहे. त्यांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, बालसाहित्य असा सहित्यक्षेत्रात विविधांगी संचार केला. ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘अभोगी’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘कालाय तस्मै नमः’ इ. नाटके लिहिली आणि गिरीश कार्नाड यांच्या ‘हयवदन’चे मराठीत रूपांतर केले. खानोलकरांचे ‘एक शून्य बाजीराव’ विख्यात दिग्दर्शिका विजया मेहता यांनी ‘रंगायन’ संस्थेकडून रंगमंचावर आणले. त्यांच्या ‘अजगर’ या १९६५ ला आलेल्या कादंबरीवर अनेकांनी आक्षेप घेतला. आचार्य अत्र्यांनी तर झोडच उठवली; मात्र त्यांनीच खानोलकरांच्या ‘माकडाला चढली भंग’ या नाटकाचे भरभरून कौतुक केले होते. ‘अवध्य’ या नाटकाचे परीक्षण करताना विख्यात समीक्षक माधव मनोहर यांनी ‘मराठी रंगभूमी वयात आली’ अशा शब्दात गौरव केला होता. मानवी जीवनातील विविध प्रवृत्तींचे दर्शन त्यांच्या साहित्यात दिसून येते. त्याचे प्रकाशित साहित्य जेवढे आहे त्याहीपेक्षा त्यांचे अप्रकाशित साहित्य अधिक आहे. ‘गणुराय आणि चानी आणि कोंडुरा‘ या साहित्यकृती चित्ररूपाने रूपेरी पडद्यावर आल्या. फिल्मफेअरचा सर्वोकृष्ट कथा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. १९७२ ला त्यांच्या ‘कालाय तस्मै नमः’ या नाटकाला आकाशवाणीचा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आणि सर्व भारतीय भाषांमध्ये या नाटकाचा अनुवाद झाला होता. दक्षिण कोकणातील ‘दशावतार’ नाटकाच्या अभ्यासासाठी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् संस्थेने शिष्यवृत्ती दिली होती. ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहाला १९७८ ला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.
खानोलकरांनी विविध साहित्यप्रकारात लेखन केले तरी मराठी साहित्यविश्वात त्यांची अधिक ओळख कवी म्हणूनच दिसून येते. त्यांच्या अनेक कविता गाजल्या. काही कवितांची चित्रपटगीते झाली. नामवंत संगीतकारांनी उत्तम चाली लावून त्यांची कविता रसिकप्रिय केली. ’गेले द्यायचे राहुनी’, ‘ती येतो आणिक जाते’, ‘नाही कशी म्हणू तुला’, ‘येरे घना‘, ’समर्इच्या शुभ्रकळ्या’, ‘कुणाच्या खांद्यावर’, ‘तू तेव्हा तशी तेव्हा अशी‘ अशा अनेक कविता गाजल्या. आरती प्रभूंच्या कवितांमधून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कळते. आयुष्यभर विविध तापत्रयांनी पोळलेला कवी म्हणतो.
दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही ।
नाव आहे चाललेली कालही अन् आजही ।।
अस्वस्थतेत असतानाच कधीतरी या विशाल सृष्टी सूर समजून येतो.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा।।
खानोलकरांना अवघे ४६ वर्षाचे आयुष्य लाभले. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व असते. २६ एप्रिल १९७६ ला त्यांचे निधन झाले. आयुष्यभर त्यांनी खूप काही सोसले; पण जगाला उत्तम काव्य, उत्कृष्ट नाटके, कादंबऱ्या दिल्या. इतके सोसूनही हा कवी म्हणतो.
बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे.
(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.