मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे
काजू बागायतीला आग
मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला आग

मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला आग

sakal_logo
By

८३५२८

मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे
काजू बागायतीला आग
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः महावितरण अधिकाऱ्यांच्या गलथानपणाचा फटका शेतकऱ्यांना बऱ्याचदा सहन करावा लागतो. असाच प्रकार मडुरा-डिगवाडी येथे आज घडला. शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडून शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या काजू व आंबाबागायतीला आज दुपारी आग लागली. वालावलकर कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांमुळे आग तातडीने विझविण्यात यश आले. महावितरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल प्रकाश वालावलकर यांनी संताप व्यक्त केला.
मडुरा-डिगवाडी येथील वीज खांबावर दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे आग लागते. याबाबत वायरमन व लाईनमन यांना योग्य ती काळजी घेण्याची विनंती वालावलकर यांनी वारंवार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज दुपारी आग लागली. त्याचवेळी बांद्याहून येणाऱ्या संदीप परब यांना बागायतीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आग लागल्याची माहिती वालावलकर यांना फोनवरून देऊन आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रकाश वालावलकर, उत्तम वालावलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली; अन्यथा काजू, आंबा बागायती जळून खाक झाली असती. महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबद्दल वालावलकर यांनी संताप व्यक्त केला. वारंवार विनंती करूनही योग्य ती काळजी घेण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल व पोलिस प्रशासनालाही त्यांनी आगीची माहिती दिली.