महिलांना आजही समाजात दुजाभाव
83532
सावंतवाडी : कार्यशाळेचे उद्घाटन करताना तहसीलदार अरुण उंडे. शेजारी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
महिलांना आजही समाजात दुजाभाव
अरुण उंडे ः सावंतवाडीत ‘राष्ट्रवादी’तर्फे विधी संवाद सत्र
सावंतवाडी, ता. १८ ः केवळ चूल आणि मूल इथपर्यंत महिला मर्यादित न राहता आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वावर दिसतो. असे असले तरी आजही महिलांच्या बाबतीत कुठेतरी भेदभाव पाहायला मिळतो. कौटुंबिक हिंसाचार, अन्याय आदी विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. अशा महिलांना कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शनाद्वारे सक्षम करण्यासाठी अर्चना घारे-परब यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, असे मत तहसीलदार अरुण उंडे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून आयोजित अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अॅड. आरती पवार, महिला शहराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई, संध्या मोरे, अॅड. सिद्धी परब, सावली पाटकर, रिद्धी परब, प्रिया परब आदी उपस्थित होते.
घारे-परब म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात २० ठिकाणी ही कार्यशाळा झाली. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कष्टाळू असून त्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात. कोरोना महामारीत त्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. गावातील प्रत्येक महिला, मुलांपर्यंत त्या पोहोचलेल्या; मात्र कायद्याच्या ज्ञानाची आज खरी गरज आहे. प्रत्येक महिलेपर्यंत कायद्याचे हे ज्ञान गेले पाहिजे. समाजात अनेक महिला विविध समस्यांचा सामना करत आहेत; मात्र त्या पुढे येत नाहीत. अन्यायाबद्दल बोलत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अशा महिलांनी पुढे यावे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडविण्यासह कायदेशीर सल्ला, पोलिसांची मदत मिळवून दिली जाणार असून हाच या अभियानामागचा उद्देश आहे.’’
ॲड. परब, ॲड. दुभाषी यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर अॅड. पवार, दर्शना बाबर-देसाई, मंगल कामत, संध्या मोरे आदींचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे तहसीलदार उंडे, घारे-परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी, संतोष जोईल, नवल साटेलकर, याकुब शेख, प्रा. सचिन पाटकर, रामदास गवस, वैभव परब आदी उपस्थित होते. प्रा. सचिन पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. पुंडलिक दळवी यांनी आभार मानले.
--
अर्चना घारेंचे काम कौतुकास्पद
महिला बालकल्याण विभागाच्या संध्या मोरे यांनी कोरोना काळासह इतरही आपत्ती काळात अंगणवाडी सेविकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. आज कायदे विषयक समुपदेशनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका विधी साक्षर होऊन याचा फायदा समाजात वावरताना होईल. अर्चना घारे यांचे हे काम कौतुकास्पद असून अशा उपक्रमांची महिलांना गरज आहे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.