मिरज अब्दुल करीम खॉ पुतळा सशोभिकरण समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज अब्दुल करीम खॉ पुतळा सशोभिकरण समारंभ
मिरज अब्दुल करीम खॉ पुतळा सशोभिकरण समारंभ

मिरज अब्दुल करीम खॉ पुतळा सशोभिकरण समारंभ

sakal_logo
By

ही बातमी टुडेत घ्यावी. तसेच अन्य अवृत्तीसाठी द्यावी.


फोटो क्रमांक ः ०४७६९
फोटो ओळी ः मिरज ः अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे उद्‌घाटनप्रसंगी प्रख्यात गायिका डॉ. प्रभा अत्रे, पालकमंत्री सुरेश खाडे. शेजारी डॉ. विनोद परमशेट्टी, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, बाळासाहेब मिरजकर, उपायुक्त स्मृती पाटील, मुकुंद संगोराम आदी.

खाँसाहेबांमुळे मिरज संगीताचे तीर्थस्थान
डॉ. प्रभा अत्रे; अब्दुल करीम खाँ यांचे भव्य स्मारक करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. १८ ः मिरज ही संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची कर्मभूमी असून, संगीत जगतासाठी हे स्थळ तीर्थस्थान म्हणून अजरामर राहिल, असे मत प्रख्यात गायिक स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी आज येथे व्यक्त केले. खाँसाहेबांच्या ८९ व्या पुण्यतिथीनिमित्त मिरज संगीत मंडळ आयोजित पुतळा परिसर सुशोभीकरण उद्‌घाटन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुरेश खाडे होते.
डॉ. अत्रे म्हणाल्या, ‘‘मिरजेत खाँसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी होणाऱ्या संगीत उत्सवाने आज एका मोठ्या सणाचे रूप घेतले आहे. या घराण्याच्या स्वरातील गोडवा शांत सुरेख, भावप्रदान, अलापी, दक्षिणात्य पध्दतीची सरगम, तानातील चपळाई ही वैशिष्ट्ये आहेत. ख्यालाप्रमाणे इतर संगीत प्रकारात विशेषत: तोडीला मानाचे स्थान मिळाले. नाट्यसंगीत भावसंगीत यांनीही मैफलीत प्रवेश केला. सामान्य श्रोत्यांना आवडणाऱ्या संगीत प्रकारांना जवळ करून खाँ साहेबांनी ख्यालालाही लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी सामान्य श्रोत्यांपर्यंत शास्रीय संगीत पोहचवले. श्रोत्यांच्या मनात संगीताबद्दल प्रेम, आदर निर्माण केले आहे. शास्त्रीय संगीत हे केवळ शास्त्र नाही. ती कला आहे. मन प्रसन्न आनंदीत करणारी, या जगाची सुंदर मंगलशाश्‍वत आहे. त्याचा स्पर्श करून देणारी ही कला आहे. या दृष्टिकोनातून किराण्याच्या कलाकरांनी संगीत साधना केली आहे. श्रोत्यांना ना त्याची जाणीवकरून दिली आहे. किराणा घराण्याच्या कलाकारांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. नवी रागांची बंदिशींची भर घातली आहे. ख्यालापासून डोंगरी, दादरा, नाट्य संगीत भावगीत गझल भक्ती संगीतापर्यंत संगीताच्या सर्व प्रकारांचे दर्जेदार प्रस्तुतीकरण केलं आणि किराणा घराण्याला विज्ञानाच्या कसोटीवरही मानाचे स्थान मिळवून दिले.’’
प्रभाताई यांच्यासह सर्वच मान्यवरांनी खॉं साहेबांचे भव्य स्मारक व्हावे, या दृष्टिकोनातून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यांची नोंद घेतली असून, मिरज येथे भव्य असे स्मारक उभे करू, महापालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करावी. त्यासाठी लागेल तो निधी मी आणत आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘या नगरीत राहून आपले नाव विश्‍व विख्यात करणारे खाँसाहेब यांनी मोठी संगीत साधना केली आहे. त्याच बरोबर तंतूवाद्य कला आणि व्यवसायालाही त्यांचा स्पर्श लाभला आहे. या व्यवसायातील तंतूवाद्य कलाकारांसाठी एक भव्य मॉल उभा करीत आहोत.’’
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रस्ताविक केले. मिरजेच्या सांगीतिक योगदानाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘‘खाँ साहेबांच्या योगदानास शोभेल, असे भव्य स्मारक येथे होणे मिरजकरांसाठी भूषणावह आहे. याचबरोबरीने येथील तंतूवाद्यांच्या विकासासाठी ठोस प्रयत्न व्हावेत.’’
डॉ. विनोद परमशेट्टी यांनी स्वागत केले. आकाशवाणीचे निवृत्त निवेदक आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब मिरजकर यांनी आभार मानले. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते अत्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंडित ऋषिकेश बोडस, नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद, नगरसेवक गणेश माळी, सुशांत खाडे, मोहसीन मिरजकर, नईम सतारमेकर उपस्थित होते. ठेकेदार मुस्तफा मुश्रीफ यांचा सत्कार केला.
...
चौकट
खाँ साहेब ते भीमसेन
जोशी समृद्घ परंपरा...
कोणताही संगीत प्रकार चांगला किंवा वाईट होतो, ते कलाकारांमुळे, आपण एकतो ते सगळे शास्त्रीय संगीत एकण्यासारखे असते का, असा प्रश्‍न विचारत अत्रे म्हणाल्या,‘‘चित्रपट संगीताला ही दर्जा आहे, हे ध्यानात घ्यायला हावे, मी किराण्याची आहे, याचा नेहमीचा मला अभिमान वाटतो. उस्ताद अब्दुल करीम खॉं साहेब ते पंडित भीमसेन जोशींपर्यंत अनेक महान कलाकरांनी या घराण्याला श्रीमंत केले.’’