
रोशन सावंतचे ‘भाजप’तर्फे अभिनंदन
83615
बांदा ः येथे रोशन सावंतचे अभिनंदन करताना भाजपचे पदाधिकारी.
रोशन सावंतचे ‘भाजप’तर्फे अभिनंदन
बांदा ः सावंतवाडी तालुक्यातील दाणोली-ओवळीये गावातील रोशन सावंत या युवकाची इंटरनॅशनल सोका फेडरेशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाच्या फुटबॉल संघात निवड झाल्याने भाजप युवा मोर्चातर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा उपसरपंच जावेद खतीब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, सिद्धेश महाजन, साई धारगळकर, बाबा काणेकर, युवा मोर्चा सावंतवाडी मंडल अध्यक्ष संदेश टेमकर, विनोद राऊळ यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोशनचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी रोशनला फोनवरून शुभेच्छा दिल्या.