
बाबल ओटवणेकर यांचे निधन
83675
बाबल ओटवणेकर
ओटवणे, ता. १८ ः येथील बाबल आण्णा ओटवणेकर (वय ६६) यांचे काल (ता.१७) मध्यरात्री निधन झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरीष्ठ लिपिक पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, बहीण, नातवंडे, जावई असा परिवार आहे. इन्सुली वीज उपकेंद्राचे वरिष्ठ यंत्र चालक लक्ष्मीकांत ऊर्फ राजू ओटवणेकर यांचे ते वडील होत.
----------
गुरुनाथ नाईक
दोडामार्ग, ता. १८ ः उगाडे येथील रहिवासी तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती गुरुनाथ अंकुश नाईक (वय ६५) यांचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. दोडामार्ग पंचायत समिती अस्तित्वात येण्यापूर्वी दोडामार्गमधील कारभार सावंतवाडी पंचायत समितीमधून पहिला जात होता. त्यावेळी ते सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.