
नाचणीच्या पदार्थांना बाजारपेठेत मागणी
swt१९३.jpg
८३७९६
हिंदळेः येथील शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी के. के. ठेपे. डॉ. दामोदर, प्रसाद परब, उपसरपंच रुपेश राणे आदी. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)
नाचणीच्या पदार्थांना बाजारपेठेत मागणी
के. के. ठेपेः हिंदळेत कृषी प्रशिक्षण मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १९ ः नाचणीचे पीक घेऊन त्यापासून नुसती भाकरी न करता विविध पदार्थ तयार करा. नाचणीच्या पदार्थांना बाजारपेठेमध्ये अधिक मागणी मिळेल, असे मत देवगड तालुका कृषी अधिकारी के. के. ठेपे यानी हिंदळे येथील कृषी प्रशिक्षण मेळाव्यात व्यक्त केले.
हिंदळे (ता. देवगड) येथील शेतकरी बाळा राणे यांच्या घरी मुणगे, हिंदळे आणि मिठबाव गावांतील शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण मेळावा नुकताच (ता. १७ ) पार पडला. शासनाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून जाहीर केले असून त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शेतीमध्ये तृणधान्य शेतीला प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमातंर्गत कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी ठेपे, ''श्री'' पध्दती भातपीक लागवड मार्गदर्शक प्रसाद परब, रामेश्वर आंबा फळ संशोधन केंद्र, गिर्येचे डॉ. व्ही. पी. दामोदर, मंडल कृषी अधिकारी पी. बी. भोसले, मुणगे सरपंच साक्षी गुरव, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, हिंदळे उपसरपंच रुपेश राणे, कृषी साहाय्यक विनिता तिरवडे, तालुका कृषी प्रतिनिधी दीपिका रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ठेपे यांनी शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक घेणे आवश्यक आहे. नाचणीच्या भाकरीप्रमाणे इतरही पदार्थ बनविता येऊ शकतात. बाजारपेठेत त्यासाठी चांगली मागणी सुध्दा असते, असे सांगून आंबा पिकावर होणाऱ्या फळमाशीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
मार्गदर्शक परब म्हणाले, "रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. बियाण्याची निवड योग्य पध्दतीने करावी. विद्यापीठाने ठरवून दिलेली भात बियाणी खरेदी करावीत, असे आवाहन करून बियाण्यावर करावयाची प्रक्रिया आणि त्यानंतर पेरणी याबाबत मार्गदर्शन केले. ''श्री'' पद्धतीने भातपिकाची लागवड केल्यास दीडपट उत्पन्न जास्त मिळते. यातून कमी खर्च व उत्पन्न जास्त प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांनी पध्दतीने भातपीक शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले. आंबा पिकाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. दामोदर यांनी आंबापीक घेताना सुध्दा सेंद्रिय खतांचा उपयोग करावा. फवारण्या, उन्हाळ्यात कलम झाडांच्या मुळामध्ये झाडाचा पतेरा तसेच गवत टाकल्यास कलमाचीमुळे पाणी टिकवून ठेवतात, याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन तालुकाधिकारी ठेपे यानी दिले.
यावेळी आंबा बागायतदार व शेतकरी संजय परुळेकर, यशवंत मुरकर, दत्तगुरू राणे, जनार्दन राणे, दशरथ राणे, राहूल पारकर, रवींद्र प्रभू, विजय परब, नंदकिशोर खोत, अरुण राणे, मनोहर राणे, विष्णू तावडे, एकता ग्रामसंघ मुणगेच्या अध्यक्षा सविता रुपे, कोषाध्यक्षा हर्षदा मुणगेकर, सानिका तेली, स्मिता तेली, संजना मुणगेकर, दक्षता मुणगेकर, सुप्रिया मेस्त्री, राघो राणे, विजय तावडे, सतीश राणे, कल्पना राणे, भारती राणे, सुरेखा राणे, मिलिंद राणे, संजय माळकर, अनिरुद्ध अभ्यंकर, धोंडीराम हिर्लेकर, मानवी राणे, सुहासिनी राणे, समता राणे, अन्वी पांचाळ, श्वेता मेस्त्री, मेघना राणे, दयानंद पटवर्धन, रुपेश परब, राजेंद्र राणे, सत्यवान मेस्त्री, महेश राणे आदींसह शेतकरी, आंबा बागायतदार उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मोफत शेती मार्गदर्शक किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विशिता तिरवडे यांनी केले. आभार हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांनी मानले.