मंडणगडात मुली ठरल्या लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगडात मुली ठरल्या लक्षवेधी
मंडणगडात मुली ठरल्या लक्षवेधी

मंडणगडात मुली ठरल्या लक्षवेधी

sakal_logo
By

rat१९p३७.jpg -KOP२३L८३८५१ मंडणगड ः सह्याद्री प्रतिष्ठान शिवजयंती उत्सवात बस स्थानक परिसरात मर्दानी खेळ सादर करणाऱ्या मुली

शोभायात्रेसह मर्दानी खेळांचे प्रात्याक्षिक
मंडणगडात मुली ठरल्या लक्षवेधी
मंडणगड, ता.१९ ः सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मंडणगड विभागाच्या वतीने मंडणगडमध्ये विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. नूतन विद्या मंदिर शाळेच्या सहयोगाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महाराज, राजमाता, मावळे यांच्या वेशभूषा धारण करून विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. शहरातील नूतन विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी रंग भरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. आज मंदिराजवळ बनाटी फिरवण्यात आली. नूतन विद्यामंदिर ते शहर परिसर अशी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. बस स्थानक परिसरात मर्दानी खेळ दाखविण्यात आले. यामध्ये तलवारबाजी, दानपट्टा, बनाटी अशा कसरती दाखविण्यात आल्या. यामध्ये मुलींनी आपले कौशल्य दाखविले. शहरातून किल्ले मंडणगड पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.